बेंगळुरूमधील नामांकित रामेश्वरम् कॅफेमध्ये १ मार्च या दिवशी बाँबस्फोट झाला. या घटनेत एकूण ९ जण घायाळ झाले. या परिसरात आय.बी.एम्., ‘एस्.ए.पी.’सारखी माहिती तंत्रज्ञान आस्थापने आणि स्टार्टअप्स (नवीन उद्योग) आहेत. देशातील माहिती तंत्रज्ञानाचे हे केंद्र आहे. बहुराष्ट्रीय आस्थापनांना व्यवसाय करण्याची ही लोकप्रिय जागा आहे. या स्फोटामुळे बेंगळुरूमधील ‘टेकसिटी’ (तंत्रज्ञानाचे शहर) राष्ट्रविघातक शक्तींच्या काळ्या सूचीत (हिटलिस्टवर) असल्याचे दिसते. काही दिवसांपूर्वी कर्नाटक येथील विधानसभेत ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्याने राज्यातील वातावरण तणावाचे असतांनाच १ मार्च या दिवशी रामेश्वरम् कॅफेमध्ये स्फोट झाला. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, ‘‘या स्फोटात अज्ञात व्यक्तीने सुधारित स्फोटक यंत्र (आयईडी) वापरल्याचे दिसते. या घटनेतील आरोपींना शिक्षा होईल. आधीच्या सरकारांमध्येही अनेक स्फोट झाले आहेत.’’ या घटनेचे गांभीर्याने अन्वेषण करण्याऐवजी सिद्धरामय्यांसारखे मुख्यमंत्री असे वक्तव्य करून राजकारण करत आहे, हे लोकांचे दुर्दैव ! मुख्यमंत्री सिद्धरामय्या लोकांचे मन विचलित करत असल्याचे दिसून येते. त्यामुळे असे शासनकर्ते राज्याचा कारभार किती कार्यक्षमपणे हाताळत असतील, ते यातून उघडपणे दिसून येते.
काँग्रेसच्या राज्यात अधिक घटना !
भाजपची सत्ता आल्यानंतर देशातील बाँबस्फोटांची संख्या पुष्कळ अल्प झाली आहे; मात्र ज्या ज्या राज्यांत काँग्रेसची सत्ता येते, तेथे बाँबस्फोटांच्या घटनांमध्ये वाढ होते; कारण या गुन्ह्यांतील धर्मांधाच्या पाठीशी काँग्रेसचे सरकार असल्यामुळे ‘आपले कुणीच वाकडे करू शकत नाही’, अशा आविर्भावात असलेले धर्मांध आणि आतंकवादी मनमानी पद्धतीने बाँबस्फोट घडवून आणतात. नोव्हेंबर २०२२ मध्ये मंगळुरू येथे कादरी हा धर्मांध प्रेशर कुकरमध्ये आयईडी स्फोटके लपवून मंजुनाथ मंदिर येथे नेत होता; मात्र कुकरचा वाटेत स्फोट झाला. अन्वेषण करणार्यांच्या मते मंगळुरू येथील प्रेशर कुकर स्फोट हा इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांनी घडवून आणला आणि यात लष्कर-ए-तोयबा या आतंकवादी संघटनेतील आतंकवाद्याचा समावेश होता. या प्रकरणी अन्वेषण आणि शोधपथक यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले होते.
आतंकवाद्यांचे मुख्य निवासस्थान पुणे ?
बेंगळुरू येथील स्फोटानंतर अन्वेषण यंत्रणांनी अनेक बाजूंनी अन्वेषण चालू केले आहे. तरीही यामध्ये शहरातील उपाहारगृहे आणि लोकप्रिय ठिकाणे यांच्या सुरक्षेत अनेक उणिवा दिसून आल्या आहेत. त्याच वेळी अशा प्रकारची ठिकाणे ही आतंकवाद्यांसाठी ‘सॉफ्ट टार्गेट’ (सहज लक्ष्य) असतात. रामेश्वरम् कॅफे स्फोटाशी संबंधित एका संशयित व्यक्तीचे छायाचित्र राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) जारी करून त्या व्यक्तीची माहिती देणार्याला १० लाख रुपयांचे पारितोषिक घोषित केले आहे. स्फोटानंतर ती व्यक्ती बसमध्ये चढत असतांनाचे चित्रीकरण सीसीटीव्हीत आहे. हा आतंकवादी बसमधून प्रवास करत पुणे येथे गेल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. यावरून ‘आतंकवाद्यांचे निवासस्थान पुणे होत आहे का ?’, असा प्रश्न पडतो. या प्रकरणी बेल्लारी जिल्ह्यातील कौलबाजार येथील कापड व्यापारी आणि प्रतिबंधित ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’शी संबंधित एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
मुसलमानांकडून आतंकवाद्यांना आसरा !
‘काही मासांपूर्वी पुणे शहरात पकडलेल्या आतंकवाद्यांचा देशातील प्रमुख शहरांत बाँबस्फोट घडवण्याचा कट होता’, अशी माहिती राज्य आतंकवादविरोधी पथकाच्या (ए.टी.एस्.च्या) अन्वेषणात उघडकीस आली आहे. ‘इस्लामिक स्टेट (आय.एस्.) आणि ‘अल सुफा’ या आतंकवादी संघटनांशी संबंधित या आतंकवाद्यांनी जगभरात करण्यात येणार्या आतंकवादी आक्रमणांची माहिती घेऊन भारतातील प्रमुख शहरांत बाँबस्फोट घडवण्याची सिद्धता केली होती’, असे ए.टी.एस्.ने न्यायालयात सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे. पुणे येथील कोंढवा परिसरातील इस्लामिक स्टेटचे महाराष्ट्रातील केंद्र ‘ए.टी.एस्.’ने उद्ध्वस्त केले होते. मुळात पुणे येथे आतंकवाद्यांना आसरा देणारे मुसलमानच होते, असेही अन्वेषण यंत्रणांच्या अन्वेषणात सिद्ध झाले आहे. त्यामुळे ‘देशातील मुसलमानांवर आता किती विश्वास ठेवायचा ?’, असा प्रश्न या निमित्ताने येथे उपस्थित होतो. अशीच परिस्थिती ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथेही आहे.
आतंकवादी आक्रमणांचे गांभीर्य अल्प !
देशातील सर्व राज्यांतील अन्वेषण यंत्रणांनी बाँबस्फोट प्रकरणांचे गांभीर्याने अन्वेषण करणे आवश्यक आहे. अन्वेषण यंत्रणांतील पोलिसांकडे सर्व सुविधा असणेही आवश्यक आहे. पुणे येथील जंगली महाराज रस्त्यावर १ ऑगस्ट २०१२ या दिवशी झालेल्या साखळी बाँबस्फोटानंतर १ वर्ष उलटून गेल्यावरही स्फोटाच्या अन्वेषणाविषयी महाराष्ट्र राज्याच्या सुरक्षा यंत्रणांची पाटी कोरीच होती. पुणे येथे १ मासात सीसीटीव्ही बसवू म्हणणार्या महाराष्ट्रातील तत्कालीन काँग्रेसच्या सरकारला वर्ष झाले, तरी सीसीटीव्ही बसवता आले नव्हते. त्याचप्रमाणे बाँब निकामी करण्याचे दायित्व असलेल्या पुणे येथील पथकाकडे ‘बाँबसूटच’ उपलब्ध नव्हता. या स्फोटांप्रकरणी ७ आरोपींना अटक करण्यात आली होती; मात्र या सर्व आरोपींना राज्याच्या आतंकवादविरोधी पथकाने अटक केली नाही, तर देहली पोलिसांनी त्यांना अटक केली होती. त्या वेळी ए.टी.एस्.चे प्रमुख पुणे येथे बसून प्रतिदिन बैठकांवर बैठका घेत होते. देहली पोलिसांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर पुणे पोलिसांना आणि महाराष्ट्राच्या ‘ए.टी.एस्.’ला आरोपींच्या अटकेची माहिती कळली. यावरून अन्वेषण यंत्रणांतील सूस्त कर्मचारी आणि अधिकारी यांना हटवून तेथे सक्षम अधिकार्यांची नियुक्ती करणे आवश्यक आहे.
आतंकवाद ही आता कुणा एका देशाची समस्या राहिली नाही, तर ती जागतिक समस्या झाली आहे. जगातील फारच थोडे असे देश असतील, ज्यांना आतंकवादाचा फटका बसला नसेल, त्यामुळे आतंकवादाच्या सूत्रावर जगातील सर्व देशांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे.
आतंकवादाविषयी राज्य सरकारांमध्ये असलेले अल्प गांभीर्य आणि अन्वेषण यंत्रणांचा सुस्त कारभार आतंकवाद्यांच्या पथ्यावर ! |