Haldwani Hindus Exodus : हल्द्वानी (उत्तराखंड) येथील जोशी विहारमधील ६० हिंदु कुटुंबांनी मुसलमानांमुळे केले स्थलांतर !

जोशी विहारमध्ये आता आहेत १५० मुसलमान कुटुंबे

हल्द्वानी (उत्तराखंड) – येथील बनभूलपुरा भागात काही दिवसांपूर्वी धर्मांध मुसलमानांनी अनधिकृत मदरसा पाडण्यावरून हिंसाचार घडला होता. आता येथील जोशी विहारमध्ये उत्तरप्रदेशातील मुसलमानांची संख्या वाढत असल्याने गेल्या ६ वर्षांत जोशी विहारमधून ६० हिंदु कुटुंबांनी स्थलांतर केल्याची माहिती समोर आली आहे. आता येथे केवळ ३ हिंदु कुटुंबे उरली असून तीही पुढील मासामध्ये घरे विकून अन्यत्र जाणार आहेत. आता जोशी विहारमध्ये १५० मुसलमान कुटुंबे रहात आहेत. त्यांच्याकडे आधारकार्ड आणि भूमीच्या नोंदीसह सर्व कागदपत्रे आहेत.

१. येथे रहाणारे देवेंद्र जोशी यांनी सांगितले की, त्यांच्या आजोबांनी येथे भूमी खरेदी केली होती. पुढे हिंदु कुटुंबे स्थायिक झाली. आजोबांनी गरजू लोकांना अल्प मूल्यामध्ये भूमी  उपलब्ध करून दिली. लोकांनी ती भूमी बाहेरच्या लोकांना विकायला चालू केले. मुसलमानांनी काही हिंदूंना त्यांची भूमी कवडीमोल भावाने विकायला लावली. रामपूरहून आलेल्या मलिक नावाच्या व्यक्तीने आधी घर घेतले. पुढे मुसलमानांच्या वस्तीची व्याप्ती वाढली.

२. लोकांच्या स्थलांतरामागे दोन कारणे आहेत. पहिला म्हणजे काही लोकांनी लालसेपोटी त्यांच्या भूमी विकल्या. दुसरे कारण म्हणजे लोकांना त्यांच्या भूमी विकण्यास भाग पाडण्यात आले. ज्या लोकांनी येथे एक लाखात भूमी खरेदी केली, ती नंतर १ कोटी रुपयांना विकली. मुसलमानांची अस्वच्छता आणि त्यांची संख्या वाढणे यांमुळे बहुतेक हिंदू भूमी विकून निघून गेले. भाजपशी संबंधित माजी गावप्रमुख मनोज मठपाल सांगतात की, येथील जमीन ४ सहस्र ५०० रुपये प्रति चौरस फूट दराने विकली जात आहे.

१. जर लोकसंख्येत पालट झाला असेल, तर तो दर्शवला जाईल. लोक येथून का गेले यासंदर्भात त्यांच्याशी बोलणार आहे. – परितोष वर्मा, उपजिल्हाधिकारी

२. लोकांची पडताळणी करणे हे आमचे काम आहे. संपूर्ण जिल्ह्यात हे काम चालू आहे. वेळोवेळी तपासणी केली जाते. जोशी विहारमध्ये रहाणार्‍या लोकांची पडताळणी केली जाईल. – प्रल्हाद नारायण मीणा, विशेष पोलीस अधीक्षक

संपादकीय भूमिका

हिंदूंच्या वस्तीत एखादा मुसलमान आला की, तो हळूहळू त्याच्या धर्मबंधूंना वस्तीत आणतो. अशा प्रकारे हळूहळू त्यांची संख्या वाढली की, गोमांस भक्षण, अस्वच्छता, दुर्गंध आदींमुळे हिंदू तेथून स्थलांतरित होतात, हेच देशभरात दिसून येते !