मुसलमान तरुणाच्या विवाहाला हिंदूंना निमंत्रित करणारी लग्नपत्रिका बनवण्यात आली हिंदु परंपरेनुसार !

श्री गणेशाला लग्नाचे आमंत्रण !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – राज्यातील बहराइच येथे एका मुसलमान तरुणाच्या विवाहाची लग्नपत्रिका सध्या सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. या पत्रिकेत श्री गणेशाला पहिले आमंत्रण दिले आहे. त्यासह पंचप्रकृतींनाही या लग्नात साक्षीदार होण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ‘मुसलमान परंपरेपासून दूर जात हिंदु रितीरिवाजानुसार विवाह करावा’, असे यात म्हटले आहे. ‘ही पत्रिका हिंदु असणार्‍या मित्रमंडळींना आमंत्रित करण्यासाठी बनवण्यात आली आहे’, असे वराच्या वडिलांनी स्थानिक पत्रकारांना सांगितले.

सौजन्य : NMF News

बहराइच जिल्ह्यातील कैसरगंजजवळ असलेल्या सफीपूर गावातील ही घटना आहे. अजुल कमर यांचा मुलगा समीर अहमद याचा २९ फेब्रुवारी या दिवशी विवाह होणार आहे. अजुल कमर यांनी सांगितले की, त्यांच्या समाजातील लोक आणि नातेवाइक यांच्यासाठी उर्दूमध्ये निमंत्रणपत्रिका छापल्या आहेत. विवाहाच्या एक दिवस आधी हिंदु बांधवांसाठी मेजवानीचे आयोजनही करण्यात आले आहे.

हिंदु परंपरेची साक्ष देणार्‍या हिंदी भाषेतील पत्रिकेची ही आहेत वैशिष्ट्ये !

१. ‘श्री गणेशाय नमः।’ने पत्रिकेचा आरंभ !

२. ‘विनम्र’ आणि ‘दर्शनाभिलाषी’ या शब्दांचा वापर !

३. ‘उत्सव’, ‘शुभविवाह’, वरासाठी ‘चिरंजीवी’ आणि वधूसाठी ‘आयुष्मती कुमारी’ अशा शब्दांचा वापर !

संपादकीय भूमिका 

कोणताही नेम नसलेल्या नि तर्कशून्य बडबड करणार्‍या अतीशहाण्या पुरो(अधो)गामी टोळीने जर आता यावरून हिंदूंना ‘हिंदु-मुसलमान ऐक्या’चे उपदेश देण्यास चालू केले, तर आश्‍चर्य वाटू नये !