रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या शिबिरात साधिकेला आलेल्या अनुभूती

सौ. सविता भगुरे

१. ‘शिबिराच्या पहिल्या दिवसापासून मला व्यासपिठावरील वक्त्यांच्या सभोवती तेजोवलय दिसले. अशी अनुभूती मला तीनही दिवस आली.

२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे अस्तित्व जाणवणे

अ. अधून-मधून मला ‘व्यासपिठावरील आसंदीवर सूक्ष्मातून गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले) बसले आहेत आणि ते माझ्याकडे पहात आहेत. ते मला ‘शिकण्याच्या स्थितीत आहेस ना ? नामजप चालू आहे ना ?’ अशी आठवण करून देत आहेत’, असे दिसले.

आ. ‘गुरुदेवांच्या चरणांतील चैतन्याचा शिबिरातील साधकांवर वर्षाव होत आहे. त्यांच्या चरणांतील चैतन्याने माझा देह भारित होऊन हलका झाला आहे’, असे मला जाणवत होते. माझा नामजप चालू होता.

३. ‘गुरुदेव आश्रमातील प्रत्येक साधकाच्या माध्यमातून माझ्यावर प्रीतीचा वर्षाव करत आहेत’, असे मला वाटत असे.

४. एकदा मी ध्यानमंदिरात बसून गुरुदेवांना आत्मनिवेदन केले. तेव्हा ‘त्यांच्या छायाचित्रातील त्यांचा सदरा गुलाबी रंगाचा झाला आहे आणि खोलीत पांढरा प्रकाश पसरला आहे’, असे मला जाणवले.

५. स्वतःत गुणवृद्धी होण्यासाठी आणि स्वभावदोषांचे निर्मूलन होण्यासाठी प्रार्थना होणे 

भोजनकक्षात जाण्यासाठी प्रत्येक पायरी चढतांना ‘माझ्यातील स्वभावदोष दूर होऊन माझ्यात १ – १ गुण वाढावा’, यासाठीची प्रार्थना माझ्यकडून आपोआप होत होती. तेव्हा मला पुष्कळ कृतज्ञता वाटत होती.

‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या कृपेने मला या दिव्य शिबिराचा लाभ मिळाला आणि वैकुंठरूपी आश्रमात रहाण्याची संधी मिळाली. मला एवढ्या अनुभूती दिल्या आणि मला सतत भावावस्थेत ठेवले’, त्याबद्दल मी गुरुदेवांच्या कोमल चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– सौ. सविता भगुरे, नाशिक (२७.११.२०२३)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक