ह्युस्टन (टेक्सास) – अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील ह्युस्टन येथील एका चर्चमध्ये ११ फेब्रुवारी या दिवशी गोळीबार झाला. या गोळीबारात एक ५ वर्षीय मुलगा आणि ५७ वर्षीय व्यक्ती गंभीररित्या घायाळ झाले आहेत. पोलिसांनी गोळीबार करणार्या महिलेला ठार केले.
१. शहर पोलीस प्रमुख ट्रॉय फिनर यांनी सांगितले की, लेकवुड चर्चने दुपारी एक महिला सतत गोळीबार करत असल्याची माहिती दिली. ही माहिती मिळताच पोलीस आणि अधिकारी घटनास्थळी पोचले.
२. फिनर यांनी सांगितले की, सुमारे ३० वर्षांच्या महिलेने हातात रायफल घेऊन चर्चमध्ये प्रवेश केला आणि तिच्यासोबत सुमारे ५ वर्षांचा मुलगाही होता. दुपारी १.५० वाजता त्या महिलेने चर्चमध्ये गोळीबार चालू केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून तेथे उपस्थित असलेल्या दोन अधिकार्यांनी गोळीबार केला आणि त्या महिलेला ठार केले.
संपादकीय भूमिकाअमेरिकेसारख्या प्रगत देशाची ही अराजकतेकडे वाटचाल नसेल कशावरून ? |

तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !
अश्लील व्हिडिओद्वारे ९ लाख रुपयांची खंडणी घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्याची फसवणूक !
वर्ष २०३० पर्यंत विदेशी रुग्णांसाठी भारत होणार दीड लाख कोटी रुपयांची बाजारपेठ !
CJP Social Media : सीजेपी आंदोलनातील सामाजिक माध्यमांच्या ५०० हून अधिक विदेशी खात्यांवर कारवाई चालू ! – महाराष्ट्र सायबर पोलीस
शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे, हा नागरिकांना राज्यघटनेने दिलेला मूलभूत अधिकार ! – Supreme Court