आळंदी (जिल्हा पुणे) – अयोध्या, काशी आणि मथुरा ही पवित्र तीर्थक्षेत्रे आहेत. ज्या पद्धतीने श्रीरामजन्मभूमीचा प्रश्न मार्गी लागला, त्याचप्रमाणे कायदेशीररीत्या मथुरा येथील श्रीकृष्ण मंदिरही उभारले जाईल, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ११ फेब्रुवारी या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले. वारकरी शिक्षण संस्थेसमोर आयोजित करण्यात आलेल्या ‘गीताभक्ती अमृत महोत्सव’ सांगता कार्यक्रमाच्या निमित्ताने ते आले असता बोलत होते.
आचार्य प्रमोद कृष्णम यांना काँग्रेसने निलंबित केल्याच्या सूत्रावर काँग्रेसवर टीका करतांना ते म्हणाले की, त्यांचा दोष एवढाच आहे की, त्यांनी काँग्रेसला ‘श्रीराम आणि श्रीराममंदिराला विरोध करू नका’, असे सांगितले होते. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
रामलल्ला विराजमान झाले, बाबा विश्वनाथांचा चमत्कार झाला, आता प्रभू श्री कृष्णाची प्राणप्रतिष्ठा होईपर्यंत विराम नाही!
परम पूज्य स्वामी गोविंददेव गिरी जी महाराज यांचा 75 जन्मोत्सवानिमित्त आयोजित गीताभक्ती अमृत महोत्सव कार्यक्रमात आळंदी, पुणे येथे उपस्थित राहण्याचे सौभाग्य लाभले.… pic.twitter.com/SbZ9SGncz7
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 11, 2024