पणजी : कुडचडे येथील श्री सातेरी मंदिराच्या बाहेरच्या भागात असलेल्या मूर्तीची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली आहे, तसेच शेजारील सर्वोदय विद्यालयाच्या सामान ठेवण्याच्या खोलीत नासधूस करून आतील काही वस्तू चोरण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे मोरजी, पेडणे येथील श्री सत्पुरुष देवाची दानपोटी चोरण्यात आली. या मंदिराची दानपेटी मागील २ वर्षे उघडली नसल्याने मोठी रक्कम पेटीत होती. चोरट्यांनी १ सहस्र रुपये रोख रक्कम मंदिरात ठेवून इतर पैसे चोरून नेले आहेत. पेडणे पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून अन्वेषण चालू आहे.
(सौजन्य : Prudent Media Goa)
(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून सर्वांना वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहेत. – संपादक)
कुडचडेतील श्री सातेरी मंदिराच्या बाहेरील मूर्तीची अज्ञातांनी तोडफोड केल्याचा प्रकार ९ फेब्रुवारी या दिवशी सकाळी उघडकीस आला. या घटनेमुळे कुडचडे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. हा प्रकार मध्यरात्री घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिक आमदार नीलेश काब्राल यांच्या मते मंदिराजवळील सीसीटीव्ही कॅमेर्यामध्ये या घटनेचे चित्रीकरण झालेले असून पोलीस लवकरच संशयिताला कह्यात घेणार आहेत.
संपादकीय भूमिकाहिंदूंची मंदिरे अजूनही असुरक्षित ! |