१. साधिकेने लाठी प्रशिक्षण करतांना ‘हनुमान प्रत्यक्ष उपस्थित आहे आणि तोच माझ्याकडून प्रशिक्षण करून घेत आहे’, असा भाव ठेवल्याने तिला लाठी गतीने फिरवता येणे
‘एकदा लाठी प्रशिक्षण करतांना ‘हनुमान प्रत्यक्ष उपस्थित आहे आणि तोच माझ्याकडून प्रशिक्षण करून घेत आहे’, असा माझा भाव होता. ‘माझे हात, म्हणजे मारुतिरायाचे हात आहेत आणि लाठी म्हणजे मारुतिरायाची गदा आहे’, असा भाव मी ठेवल्यामुळे मला लाठी गतीने फिरवता आली.
२. एका संतांचे दर्शन होणे आणि त्यांनी प्रसाद देणे
हनुमंतरायाला अनुभवत प्रशिक्षण केलेल्या रात्री मला एका संतांचे दर्शन झाले. त्यांनी मला प्रसाद दिला. ‘प्रशिक्षण करतांना तिथे खरोखरच हनुमंत आहेत आणि त्यांनी माझ्याकडून प्रशिक्षण करून घेतले’, असे मला वाटले.
३. ‘हाता-पायांमध्ये श्रीकृष्णाचीच शक्ती आहे’, असा भाव ठेवल्याने मनातील कर्तेपणाचे विचार नाहीसे होणे
सकाळचे प्रशिक्षण करतांना पहिले २ दिवस माझ्या मनात कर्तेपणाचे विचार होते. तेव्हा मी श्रीकृष्णाला शरण जाऊन प्रार्थना केली. तसेच ‘प्रत्येक प्रहार, मार आणि रोध करतांना माझ्या हाता-पायांमध्ये श्रीकृष्णाचीच शक्ती आहे’, असा भाव ठेवला. त्यामुळे माझ्याकडून ते प्रकार अधिक गतीने आणि ताकदीने होत होते. तेव्हापासून माझ्या मनातील कर्तेपणाचे विचार नाहीसे झाले आणि मला भावस्थितीत राहून प्रशिक्षण करता आले.
४. दंडसाखळीचे प्रशिक्षण करतांना मारुतिरायाला प्रार्थना केल्यावर प्रकार गतीने आणि क्षात्रभावाने केले जाणे
दंडसाखळीचे प्रशिक्षण करतांना माझ्या मनात कर्तेपणाचे विचार होते. त्यामुळे माझे प्रकार पुष्कळ चुकत होते. माझ्या मनात क्षात्रभाव नव्हता. माझी प्रकार करतांना गती अल्प होती. तेव्हा मी मारुतिरायाला प्रार्थना केली. त्या वेळी माझ्याकडून प्रकार गतीने आणि क्षात्रभावाने केले गेले.
– कु. प्रेरणा मठपती (वय १५ वर्षे), कोल्हापूर (२.८.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |