मुंबई – गुन्हेगारी जगतातील (‘अंडरवर्ल्ड’मधील) अनेक गुन्हेगारांना यमसदनी पाठवणारे चकमक विशेषज्ञ (‘एन्काऊंटर स्पेशालिस्ट’) प्रदीप शर्मा यांच्या अंधेरी येथील घरी आयकर विभागाने धाड घातली. ‘अँटेलिया’ या अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके ठेवणे आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरण यांत प्रदीप शर्मा हे आरोपी आहेत. या प्रकरणी ते कारागृहात होते. ऑगस्ट २०२३ मध्ये त्यांना जामीन मिळाला. लखनभय्या चकमक प्रकरणी दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा आरोपामुळे वर्ष २००८ मध्ये त्यांना निलंबित करण्यात आले होते.