Indo-Myanmar Fencing : भारत म्यानमारच्या सीमेवर १ सहस्र ६४३ कि.मी. लांबीचे कुंपण घालणार !  

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

नवी देहली – भारत-म्यानमार सीमेवर तब्बल १ सहस्र ६४३ किमी लांबीचे कुंपण घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली.  म्यानमारमधून लोक भारतात घुसखोरी करत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

याखेरीज गस्तीसाठी स्वतंत्र मार्ग (ट्रॅक) बनवण्यात येणार आहे. सध्या मणीपूरमधील मोरेहपासून १० कि.मी. लांबीचे कुंपण घालण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका

म्यानमारमधून आधीच घुसखोरी करून आलेल्या रोहिंग्यांनाही लवकर देशातून हाकलण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, असेही जनतेला वाटते !