
मुंबई – आगरा येथील सोहेल कुरेशी हा अयोध्येतील श्रीराममंदिरावर आक्रमण करणार असल्याचा दूरध्वनी सोहम पांडे याने मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला ३ फेब्रुवारीला रात्री केला. आगरा ते मुंबई असा प्रवास करतांना त्याला ही माहिती मिळाल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्याने कुरेशीचा भ्रमणभाष क्रमांक आणि एका आर्.पी.एफ्. कर्मचार्याचा भ्रमणभाष क्रमांकही पोलिसांना दिला. भ्रमणभाष क्रमांकाच्या माध्यमातून याविषयी यंत्रणा शोध घेत आहेत.
| या संदर्भात एका पोलीस अधिकार्याने सांगितले, ‘‘गेल्या वर्षभरात मुंबई पोलिसांना धमक्या आणि खोटी माहिती देणारे किमान शंभरहून अधिक संदेश अथवा भ्रमणभाष आले आहेत; परंतु कुणाचाही निरोप आला, तरी त्याकडे दुर्लक्ष न करता, तो गांभीर्याने घ्यावा लागतो. त्यासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लागते. त्या व्यक्तीला अटकही होते. अशा प्रकरणांमध्ये आरोपीला लवकर जामीन मिळतो. त्यामुळे अशा प्रकरणांसाठी कठोर कायदा करण्याची आवश्यकता आहे. अशा धमक्या पोलिसांसाठी डोकेदुखी ठरल्या आहेत.’’ |
Kailash Vijayvargiya On RSS : रा.स्व. संघात गर्दी वाढल्याने चांगल्या लोकांची कमतरता !
फोर्ट (मुंबई) येथील शासकीय जागेच्या प्रकरणी चर्चला जिल्हाधिकार्यांकडून थकित पैशांच्या वसुलीची नोटीस !
Foreign Universities In India : १५ विदेशी विद्यापिठांना भारतात शाखा चालू करण्यास संमत्ती
Ghaziabad Mazar Demolished : गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे अतिक्रमण करून बांधलेली ३ मजली मजार भुईसपाट !
Ram Temple Raid : श्रीराममंदिरातील दान चोरीतील ८ आरोपींच्या घरी पोलिसांची धाड
इंधन बचत करा आणि सोने खरेदी मर्यादित ठेवा ! : Narendra Modi