स्त्रियांनी यजमानांशी (पतीशी) आदराने वागावे !

सौ. वर्धिनी गोरल

‘सध्या लग्न झालेल्या स्त्रिया यजमानांना (पतीला) एकेरी नावाने संबोधतात. पूर्वीच्या स्त्रिया यजमानांना आदराने बोलवत असत. यजमानांना एकेरी नावाने संबोधल्याने त्यांचा मान राखला जात नाही. स्त्रियांना ‘यजमानांशी कसे वागतो ?’, याचे भान नसते. आपण यजमानांशी जेवढे आदराने वागू, तेवढे आपल्यासाठी चांगले असते. त्यामुळे पती-पत्नी यांच्यातील भांडणाचे प्रमाण न्यून होऊन त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण होत नाही.’

– सौ. वर्धिनी गोरल (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय २७ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.