पालघर येथे समुद्रकिनार्‍यालगत अमली पदार्थांच्या शोधासाठी पोलिसांची मोहीम चालू !

पालघर – चोरट्या मार्गाने आणण्यात येणार्‍या अमली पदार्थ प्रकरणी पोलिसांकडून शोधमोहीम चालू आहे. समुद्रकिनार्‍यालगतच्या गावांमध्ये पोलिसांचा पहारा वाढवण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी समुद्रमार्गे राज्याच्या लगतच्या समुद्रात तस्करांनी मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ फेकले असल्याची माहिती मिळाली होती. हा अमली पदार्थ समुद्राच्या भरतीच्या लाटेतून किनार्‍यावर आला आणि मासेमारी करणार्‍या लोकांच्या हाती लागला होता. नंतर त्याची विक्रीही झाल्याचे समजले. ‘संशयास्पद पदार्थ आढळून आल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी’, असे आवाहन करण्यात येत आहे.