सांख्य दर्शनाचे प्रवर्तक महर्षि कपिल !

भारतातील महान ऋषि परंपरा (लेखांक १२)

वेद, उपनिषदे आणि पुराण ग्रंथांत ऋषींचा अनेकदा उल्लेख आलेला आहे. भारतीय संस्कृतीचे योग्य आकलन होण्यासाठी या सदराच्या माध्यमातून आपण ऋषि परंपरा समजून घेत आहोत. या लेखात महर्षि कपिल यांच्याविषयी जाणून घेऊया.

१. पृथ्वीवर गंगा अवतरण्यसाठी कपिल मुनींनी केलेला उपदेश

‘सगर राजाने अश्वमेध यज्ञ आरंभ केला होता. हा त्याचा १०० वा यज्ञ असल्यामुळेइंद्र घाबरला; कारण १०० यज्ञ पूर्णकरणार्‍याला इंद्रपद मिळते. आपलेइंद्रपद जाऊ नये, यासाठी इंद्रानेसगराचा यज्ञाचा घोडा पळवला आणि कपिल महर्षींच्या आश्रमात बांधला. ‘आपला घोडा या ऋषींनीपळवला’, असेवाटून सगरपुत्रांनी ऋषींच्या समवेत युद्ध करण्यास आरंभ केला. क्रोधित झालेल्या कपिल महर्षिंनी सगरपुत्रांना भस्मसात केले. आपल्या पितरांना सद्गती मिळावी; म्हणून सगराचा नातूकपिल महर्षिंना विनवू लागला, तेव्हा ऋषींनी सांगितले, ‘‘स्वर्गातील गंगा नदीला पृथ्वीवर आणून त्यामध्येअस्थीविसर्जन केल्यानंतर तुझ्या पितरांना सद्गती मिळेल.’’ सगर वंशातील भगीरथ राजाने गंगानदीला पृथ्वीवर आणण्याचे कार्य केले. कपिल ऋषींच्या उपदेशामुळे केवळ सगरपुत्रांनाच नाही, तर मानवजातीला गंगाजलाचेवरदान मिळाले.

२. कपिल मुनींचा जीवन परिचय

कपिल महर्षि हे कर्दम ऋषींचे पुत्र होते. कर्दम ऋषि हे ब्रह्मदेवाच्या छायेपासून निर्माण झालेले होते आणि त्यांची पत्नी देवहूती ही स्वयंभू मनूची कन्या होती. कर्दम ऋषींनी आपल्या कन्यांचे विवाह मरिची, अत्रि, भृगु, अंगिरा, पुलह, पुलस्त्य, शशिष्ठ, ऋतु, अथर्वाअशा श्रेष्ठ ऋषींशी केले. त्यांचा पुत्र कपिल हा जन्मतः ज्ञानी, सत्वशील आणि योगी होता. भागवत पुराणात महर्षिकपिलांना सायंर्श्वमन्वंतरातील विष्णूच्या २४ अवतारांपैकी पाचवा अवतार मानलेआहे. आपल्या पुत्राची योग्यता पाहून कर्दमऋषींनी कपिलला अभिवादन केले आणि ते सर्वसंगपरित्याग करून तपश्चर्येसाठी निघून गेले. कर्दम ऋषि हे विरागी वृत्तीचे असल्यामुळे त्यांनी विवाहानंतर असे ठरवले होते की, देवहूतीला पुत्रप्राप्ती होताच संसार सोडून वनात निघून जायचे. त्याप्रमाणे कपिल महर्षिंच्या जन्मानंतर ते तपश्चर्ये साठी निघून गेले. कर्दम ऋषींच्या पत्नीला म्हणजे देवहूतीला पतीच्या जाण्यानेदुःख झाले. संसाराशी लिप्त झाल्यामुळे या शोकातून ती बाहेर येईना. कपिल महर्षि मातृप्रेम होते. त्यांना आपल्या मातेचा शोक पहावेना. वडील परत येऊन मातेचेदुःख दूर करणेही अशक्य गोष्ट होती; म्हणून त्यांनी जीवनाचेमूलभूत ज्ञान देऊन आईचेमन शांत करण्याचा प्रयत्न केला. कपिल ऋषींनी दिलेल्या ज्ञानामुळे देवहूतीचे दुःख हलके झाले आणि ज्ञानाने प्रगती करून तिनेमोक्षप्राप्ती केली.

३. सांख्य सिद्धांताचे शास्त्रीय विवेचन करून आदिसिद्ध ठरलेले महर्षि कपिल

महर्षि कपिलांनी आपल्या मातेला केलेला उपदेश म्हणजे ईश्वरवादी सांख्य तत्त्वज्ञान होते. कपिल महर्षि सांख्य दर्शनाचे प्रवर्तक होते. श्वेताश्वेतर उपनिषदात हेसांख्य तत्त्वज्ञान प्रथम आलेआहे;परंतुतेसूत्रबद्ध आणि सविस्तरनव्हते. कपिल महर्षींनी सांख्य सिद्धांताचे शास्त्रीय विवेचन करून त्याला दर्शनाची प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांचे हे ज्ञान श्रेष्ठत्व पाहून त्यांना ‘आदिसिद्ध’ किंवा ‘आदिविद्वान’ असे म्हटले जाते. भगवान श्रीकृष्णांनीही भगवद्गीतेत ‘सिद्धांना कपिलोमुनिः ।’ असा उल्लेख केला आहे. याचा अर्थ ‘सिद्ध पुरुषांमध्येश्रेष्ठ असेकपिल मुनी, म्हणजेमी आहे.’ सांख्य म्हणजे संख्येची गणना. ज्यामध्ये तत्त्वांची गणना केली आहे, तेसांख्य ! तत्त्वज्ञान, तसेच ‘सांख्य’ या शब्दाचा अर्थ विवेकज्ञान असाही होतो. ‘जेतत्त्वज्ञान ऐकून मोक्षप्राप्तीचे ज्ञान माणसाला होते, तेसांख्य तत्त्वज्ञान’, असेसांख्य तत्त्वज्ञानाचे अर्थ केलेलेआहेत.

४. सांख्यदर्शनाविषयी थोडक्यात विवेचन

सांख्यदर्शन हे भारतीय षड्दर्शनांपैकी एक दर्शन आहे. या दर्शनाची मांडणी म्हणजे विश्व विकासाची भौतिक दृष्टीकोनातून मीमांसा करण्याचा पहिलाच भव्य आणि तर्कनिष्ठ प्रयत्न आहे. प्रकृती आणि पुरुष यांच्या विश्लेषणातून सृष्टीची उत्पत्ती अन् लय यांचे विवेचन यामध्ये केलेआहे. सुख-दुःख ही प्रकृतीची देणगी आहे. पुरुष हा अज्ञानबद्ध  असल्यामुळे अधिक दुःखी होतो. त्याला तत्त्वज्ञान द्वारे मोक्षाचा मार्ग दाखवणे,हे सांख्य शास्त्राचे उद्दिष्ट आहे. यामध्ये कर्मकांडापेक्षा ज्ञानकांडाला महत्त्व आहे. कपिल महर्षींच्या सांख्य तत्त्वज्ञानापूर्वी ‘कर्महा मोक्षाचा एकच मार्गआहे’, असेमानलेजाई. महर्षि कपिलांनी प्रथम ध्यान आणि तप या मार्गांचा उपदेश केला. ज्ञानाला जे पूर्वी चर्चेचे स्वरूप होते, ते नष्ट करून कपिलांनी ज्ञानाला साधनेचे रूप प्राप्त करून दिले. मोक्षमार्गात त्याग, तपस्या आणि समाधी या तत्त्वांचे प्रतिपादन केले. कपिल महर्षींचेसांख्यसूत्रआणि तत्त्वसमास,असे २ ग्रंथआहेत. ‘कपिलगीता, कपिल पंचरात्र, कपिल स्मृति, या ग्रंथांची निर्मिती करणारे महर्षी कपिल नसावेत’, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे; कारण या ग्रंथामध्ये निरीश्वरवादी सांख्य शास्त्राचे विवरण आढळते. शंकराचार्यांनी निरीश्वरवादी यांच्या शास्त्रावर टीका केली आहे. कपिल महर्षींच्या ईश्वरवादी सांख्य दर्शनाचा सिद्धांत, उपनिषत् कालानंतर पातंजल योगसूत्रात आलेआहेत. गुणत्रय प्रकृती, निर्गुण विश्वकर्तादेव, क्षेत्रज्ञ, कर्मकर्ता, व्यक्त आणि अव्यक्त, प्राणायाम, योग,इत्यादी सांख्य आणि योग दर्शनातील विचार अन् परिभाषा यांचेवर्णन कपिल महर्षीनी श्वेताश्वेतर उपनिषदात केले होते. ते पुढे पातंजल योगसूत्रात आले आहे.’

– स्वाती आलूरकर (साभार : मासिक ‘मनशक्ती’, ऑक्टोबर २००६)