JaiShriRam India China Border : भारत-चीन सीमेवर दोन्ही देशांच्या सैनिकांनी दिल्या ‘जय श्रीराम’च्या घोषणा !

‘जय श्रीराम’

नवी देहली – अयोध्येतील श्रीराममंदिरात श्री रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर सामाजिक माध्यमांतून भारत आणि चीन यांच्या सैनिकांचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला आहे.

या व्हिडिओमध्ये भारत आणि चीन यांचे सैनिक ‘जय श्रीराम’ अशा घोषणा देतांना दिसत आहेत. हा व्हिडिओ प्रत्यक्ष नियंत्रणरेषेचा असल्याचा दावा केला जात आहे.