नथुराम गोडसे स्मृतीस्थळ विकसित करण्यासाठी १०० कोटींचा निधी द्यावा ! – अजय सिंह सेंगर, महाराष्ट्र करणी सेना

पुणे येथे नथुराम गोडसे यांच्या घरी अस्थीदर्शनानंतर अजय सिंह सेंगर यांनी व्यक्त केले मत !

नथराम गोडसे यांच्या अस्थींचे दर्शन करताना (डावीकडे) नथुराम गोडसे यांचे नातू अजिंक्य गोडसे आणि अजय सिंह सेंगर

पुणे – हिंदु राष्ट्र निर्माण करणे हे नथुराम गोडसे यांचे स्वप्न होते; म्हणून मोदी सरकार यांना हे राष्ट्र हिंदु राष्ट्र म्हणून घोषित करायचे असेल, तर नथुराम गोडसे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे उदात्तीकरण करणे देशहित आणि हिंदु धर्म हितासाठी आवश्यक आहे. त्यांचे विचार आणि कार्य अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करणे आवश्यक आहे. हिंदु भक्त आणि राष्ट्रभक्त यांचा सन्मान झाल्यासच हिंदु धर्म मजबूत होईल. त्यामुळे ‘शहीद नथुराम गोडसे अस्थीकलश दर्शनस्थळाला तीर्थक्षेत्र दर्जा द्या आणि नथुराम गोडसे स्मृतीस्थळ विकसित करण्यासाठी १०० कोटींचा निधी राज्य सरकारने द्यावा’, असे मत महाराष्ट्र करणी सेना प्रमुख अजय सिंह सेंगर पुणे येथे नथुराम गोडसे यांच्या घरी अस्थीदर्शनानंतर व्यक्त केले.

नथुराम गोडसे अस्थीकलश

या वेळी सह हिंदु जीवाधार सेवक संघ मिलिंद कुलकर्णी, मकरंद कुलकर्णी, कैलास देशमुख, कैलास देशमुख, दिलीप शिरोळे, गणेश जंगम, विश्वनाथ खलुरे, गजानन चिखलेवार, कृष्णराव नेरे, आत्माराम कोठावडे आदी उपस्थित होते.