रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे
रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः ।
रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहम्
रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर ॥
अर्थ : राजांमध्ये शिरोमणी राम सदैव विजयी होवो. मी रमापती रामाला भजतो. ज्या रामाने समस्त राक्षससेनेचा नाश केला त्या रामाला माझा नमस्कार असो. रामाविना तरणोपाय नाही. त्या रामाचा मी दास आहे. रामामध्ये माझ्या चित्ताचा लय होवो. हे रामा, माझा उद्धार कर.’
– सौ. निर्मला घाटे
(साभार : मासिक ‘प्रतिबिंब’)