नागपाडा (मुंबई) येथे ३९ वर्षीय पोलिसाची आत्महत्या !

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – नागपाडा पोलीस रुग्णालयाच्या दुसर्‍या मजल्यावरून उडी मारून ३९ वर्षीय पोलिसाने आत्महत्या केली. (पोलिसांनो, आत्महत्येचा पर्याय निवडण्यापेक्षा शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी साधना करा ! – संपादक) कैलास एकनाथ गवळी असे मृत पोलिसाचे नाव आहे. ते स्थानिक सशस्त्र पोलीस-३ येथे कार्यरत होते. नुकतीच त्यांचे माहीम पोलीस ठाण्याहून स्थानांतर करण्यात आले होते. ते ८९ दिवस अनुपस्थित असल्यामुळे तंदुरुस्त असल्याचे प्रमाणपत्र मागण्यात आले होते. त्यासाठी त्यांना नागपाडा पोलीस रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांनी रुग्णालयातील दुसर्‍या मजल्यावरील शौचालयाच्या खिडकीतून खाली उडी मारली. यात त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. त्यामुळे त्यांना जे.जे. रुग्णालयात भरती करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान गवळी यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी नागपाडा पोलिसांनी गवळी यांच्या पत्नीचा जबाब नोंदवला आहे.