मॉरिशसमध्ये श्री रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी २ घंटे सुटी !

पोर्ट लुईस – मॉरिशसमध्ये २२ जानेवारीला श्रीराममंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी २ घंटे विशेष सुटी घोषित करण्यात आली आहे. मॉरिशसमध्ये कार्यरत असलेल्या हिंदूंना २ घंट्यांच्या या विशेष सुटीच्या काळात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण आणि पूजाविधी आदी कार्यक्रम पहाता येणार आहेत. मॉरिशस सरकारच्या या निर्णयामुळे तेथील हिंदूंनी आनंद व्यक्त केला आहे. या निर्णयामुळे त्यांना श्रीराममंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या क्षणांचे साक्षीदार होण्याची संधी मिळणार आहे.

मॉरिशसमधील हिंदु संघटनांनी २२ जानेवारीला २ घंट्यांची विशेष सुटी देण्याची मागणी सरकारकडे केली होती. मॉरिशसमध्ये अनुमाने ४८.५ टक्के लोक हिंदू आहेत. आफ्रिकन खंडातील मॉरिशस हा एकमेव देश आहे जिथे हिंदु धर्माचे सर्वाधिक पालन केले जाते. भारत आणि नेपाळ या देशांनंतर मॉरिशसमध्ये सर्वाधिक हिंदू रहातात.