‘तमिळनाडूमधील काहींना तमिळ भाषेचा अतोनात अभिमान आहे; कारण ती फार जुनी असून संपन्न आहे; म्हणून त्यांचा कोणत्याही भारतीय भाषांना विरोध असतो. हिंदी, संस्कृत, मराठी आणि तेलुगु भाषाविषयक त्यांच्या धारणा विलक्षण आहेत. या भाषांचा वापर तमिळनाडूत आपण करू लागलो, तर त्यांचा आक्षेप असतो. याला अपवाद आहे इंग्रजीचा; पण खरी गंमत पुढेच आहे. उपरोक्त भाषा व्यवहाराने तमिळला बाधा येत असेल, तर इंग्रजीनेही तमिळला बाधा आली पाहिजे. ‘अशी ही श्रेष्ठ भाषा आपल्यापुरतीच मर्यादित असली पाहिजे’, असा त्यांचा आग्रह असतो; म्हणून संस्कृत, इंग्रजी या भाषांची बरोबरी करणार्या भाषेला या प्रादेशिक भाषावाद्यांनी अखिल भारतीय स्तरावर कधीही नेली नाही, नेत नाही. हीच गोष्ट कन्नड आणि मराठी भाषेचीही आहे.
भारतीय भाषा विकासाचे आणि संपन्नतेचे खरे विरोधक सुशिक्षित अडाणी प्रादेशिकवादी आहेत.’
(साभार : त्रैमासिक ‘प्रज्ञालोक’, जुलै ते सप्टेंबर २०२२)