गुजरातच्या शाळेतील व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित !
नवी देहली : सामाजिक माध्यमांतून सध्या मोठ्या प्रमाणात प्रसारित होणार्या एका व्हिडिओमध्ये शाळेत शिक्षकांकडून विद्यार्थ्यांची हजेरी घेत असतांना विद्यार्थी ‘हजर’ किंवा ‘उपस्थित’ असे न म्हणता ‘जय श्रीराम’ असे म्हणत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ गुजरातमधील असल्याचे सांगितले जात आहे. यावरून काही जाणांनी ‘विद्यार्थ्यांना शाळेपासूनच संस्कृतीविषयी ठाऊक असणे चांगले आहे’, असे म्हटले आहे, तर काही जणांनी ‘शाळेत अशा धार्मिक कृती करण्याची अनुमती देऊ नये’, असे म्हटले आहे.
गुजरात सरकारने सर्व शाळांना १ जानेवारी २०२० पासून हजेरी देतांना विद्यार्थ्यांनी ‘जय भारत’ किंवा ‘जय हिंद’ म्हणायला सांगण्याचा आदेश दिला होता.