
पणजी, ७ जानेवारी (वार्ता.) – श्रीरामजन्मभूमी आंदोलनात गोमंतकियांचा सहभाग असणे, ही अभिमानाची गोष्ट आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे. रामजन्मभूमी
सावंत पुढे म्हणाले, ‘‘श्रीरामजन्मभूमी आंदोलनाच्या वेळी कारसेवक म्हणून गोव्यातील अनेक जण अयोध्येला गेले होते. राष्ट्र उभारणीच्या या कार्यामध्ये गोव्यातील लोकांचा सहभाग, ही अभिमानाची गोष्ट आहे. प्रत्येक भारतियासाठी श्रीराममंदिर हे ‘राष्ट्रमंदिर’ आहे.’’
‘गोव्यातील अनेक मंदिरे जी पोर्तुगिजांनी नष्ट केली, त्या मंदिरांचे स्मारक बांधण्यात येईल का ?’, या प्रश्नाला उत्तर देताना सावंत म्हणाले, ‘‘यासंबंधी स्थापन केलेल्या समितीचा याविषयीचा अहवाल सिद्ध झाला आहे. हा अहवाल सरकारकडून स्वीकारण्यात येईल.’’ पर्वरी येथे होणार्या उड्डाण पुलाविषयी सावंत म्हणाले, ‘‘पर्वरी येथे उड्डाण पूल होईपर्यंत या मार्गावरून बांदा येथून येणारी अवजड वाहने बांदा-दोडामार्ग-अस्नोडामार्गे वळवण्यात येतील. पर्वरी आणि साळगाव या ठिकाणच्या रस्त्यांचे रूंदीकरण करण्याचे काम सरकारने चालू केले आहे अन् उड्डाण पूल बांधण्याच्या वेळी वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाविषयीचा सविस्तर आराखडा सिद्ध करण्यात आला आहे. याच्या जोडीला बेती-पणजी फेरीसेवा चालू करण्यात येईल. या दोन वर्षांच्या कालावधीत लोकांची गैरसोय होईल; परंतु लोकांनी सहकार्य करावे. सरकारकडून भूमी कह्यात घेण्याची प्रक्रिया झाल्यानंतर चोडण येथील पुलाची पायाभरणी करण्यात येईल.’’
अयोध्येला जाणे न परवडणार्या सामान्य नागरिकांना सरकार साहाय्य करील ! – मुख्यमंत्रीपणजी – गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घोषित केले आहे की, ज्या सामान्य नागरिकांना अयोध्येला जाणे परवडत नाही, त्यांच्यासाठी निधीचे प्रावधान गोवा सरकार करील. येत्या फेब्रुवारीत येणार्या अर्थसंकल्पात या संदर्भातील घोषणा केली जाईल, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले. अयोध्येला जावे, असे सर्वांना वाटते तथापि ज्यांची जाण्याची ऐपत आहे, त्यांनी स्वतः जावे. ते रस्ते, विमान आणि रेल्वे या मार्गांनी जाऊ शकतात. तथापि ज्यांना अयोध्येला जायचे आहे; पण परवडत नाही, अशा सामान्य गोमंतकियांसाठी सरकार प्रावधान करील, असे ते पुढे म्हणाले. |
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहराच्या प्रबोधनानंतर मुगाळी (गोवा) येथील रस्त्याच्या बाजूचा कचरा हटवला
पंढरपूर येथे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या ९ नगरसेवकांचा भाजपला पाठिंबा !
फहीमने ‘साहिल’ असल्याचे भासवून हिंदु तरुणीला अडकवले जाळ्यात : ओलीस ठेवून सामूहिक बलात्कार !
हवाईदलाचे विमान कोसळून ५ सैनिकांना वीरमरण
आतंकवाद्यांच्या पाठीराख्यांना सिंधु नदीचे पाणी मिळणार नाही ! : Defence Minister Rajnath Singh
UP Bulldozer Action : श्री चामुंडा मंदिराच्या भूमीवरील धार्मिकस्थळाचे अतिक्रमण हटवले !