
पुणे – येथील शरद मोहोळ यांची ५ जानेवारी या दिवशी दुपारी दीड वाजता त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. कोथरूडमधील सुतारदर्यात दुचाकीवरून आलेल्या आक्रमणकर्त्यांनी शरद मोहोळ यांच्यावर समोरून गोळ्या झाडल्यानंतर ते गंभीर घायाळ झाले. यानंतर त्यांना अत्यंत गंभीर अवस्थेत रुग्णालयात भरती करण्यात आले; पण त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. आक्रमणकर्त्यांचा शोध घेण्यासाठी तपास पथके रवाना करण्यात आल्याची माहिती कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक हेमंत पाटील यांनी दिली आहे. शरद मोहोळ यांच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यांसारखे अनेक गंभीर गुन्हे नोंद आहेत. शरद मोहोळ यांच्यावर आक्रमण कुणी आणि का केले ? याची अद्याप कोणताही माहिती समोर आलेली नाही.
पनवेल येथील ७ गायींच्या मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करणार ! – उदय सामंत, उद्योगमंत्री
मयंक लोहार हत्याप्रकरणी सरकार विधानसभेत निवेदन करणार !
Asim Munir Assassination Plan : इस्रायलची गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’ने रचला होता पाकचे सैन्यदलप्रमुख असीम मुनीर यांच्या हत्येचा कट !
Nasrapur Case : आरोपी भीमराव कांबळे दोषी; २९ जूनला सुनावणार अंतिम शिक्षा
हिंदुत्वनिष्ठांच्या सतर्कतेमुळे संशयास्पदरित्या फिरणारे ३ काश्मिरी मुसलमान पोलिसांच्या कह्यात
बांदोडा येथील जैन समाजाच्या वारसा स्थळी मोहरमनिमित्त उघड्यावर बकरा कापण्यास बंदी घाला