छत्रपती संभाजीनगर – येथील मौलाना आझाद महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेणारा ओसामा अली युसूफ अहमद (वय २३ वर्षे) याने इयत्ता १० वीमधील २ मुलांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी सिटी चौक पोलिसांनी २२ डिसेंबर या दिवशी त्याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ओसामा हा सुदान देशाचा रहिवासी असून तो मौलाना आझाद महाविद्यालयात एकही दिवस उपस्थित नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
१. हडको शिवछत्रपतीनगर येथील १५ वर्षांचा मुलगा इयत्ता १० वीच्या वर्गात शिकत असून त्याचे वडील बजाज आस्थापनात काम करतात. मुलगा २१ डिसेंबरच्या रात्री जेवून मित्रांसह घरासमोर उभा होता. सुनील लोहिया यांच्या घरात भाड्याने रहात असलेल्या ओसामाने दोघांना घरात बोलावले.
२. ओसामा याने दार बंद करून दोघांना इस्लामचे धडे देण्यास प्रारंभ केला. एका कागदावर काहीतरी लिहून तो शेगडीवर जाळत होता. निघालेला धूर तो दोघांना देत होता. यामुळे दोघांनी घाबरून घरातून पळ काढत घर गाठले.
३. ‘ओसामा आम्हाला इस्लाम धर्म स्वीकारण्याविषयी धडे देत आहे’, असे मुलांनी वडिलांना सांगितले. त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केल्यावर साहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी चौरे यांनी गुन्हा नोंद करून ओसामा याला अटक केली.
४. पोलीस उपायुक्त नितीन बगाटे म्हणाले की, ओसामाचा कुणाशी आंतरराष्ट्रीय संबंध आहे का ? याचे अन्वेषण चालू आहे. या प्रकरणात आमच्या समवेत राज्य गुप्तवार्ता शाखा आणि आतंकवादविरोधी पथक प्रतिनिधी हेही अन्वेषण करत आहेत.
५. ओसामा दीड वर्षात एकदाही महाविद्यालयात उपस्थित नव्हता. त्यामुळे संशय बळावतो. ‘तो धर्मांतर करणारी यंत्रणा चालवतो का ?’, याचे अन्वेषण चालू आहे. त्याचा एक साथीदार मौलाना आझाद महाविद्यालयात शिक्षण घेतो. आरोपीकडून चिठ्ठ्या आणि २ भ्रमणभाष संच जप्त केले आहेत, अशी माहिती साहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी चौरे यांनी दिली.
संपादकीय भूमिका
|