हे सच्चिदानंदा, साकार व्हावे तुझे दिव्य स्वरूप ।।

सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव सोहळा पाहिल्यावर ‘हा सोहळा पहायला मिळणे’, ही भाग्याची गोष्ट आहे’, असे वाटून माझ्याकडून त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली. त्या वेळी मला सुचलेली ही शब्दसुमने मी त्यांच्या चरणी अर्पण करतो.

श्री. शिवराज पाटील

कैक जन्मांचे पुण्य फळां आले आता ।
खर्‍या अर्थाने जन्म सार्थकी लागला आता ।।

अहं गळला, भेदाभेद जळला ।
शाश्वत आनंद उरी माझ्या भरला ।। १ ।।

हे अनादि अनंता, सच्चिदानंदा ।
मी भावविभोर, तुझे रूप समोर ।।

अवतरले होते युग द्वापर ।
मी उभा अवलोकित पामर ।। २ ।।

कृपा तुझी, मिटला संशयकल्लोळ ।
जळोनी सारे विकार, हृदयी तुझे रूप साकार ।।

करोनी घ्यावी आता साधना, मिटली चिंता अन् वेदना ।
बुद्धी द्यावी, तन-मन-धन अर्पिण्या ।। ३ ।।

कृपा करी मायाचक्र चालका ।
बोलवा या अजाण बालका ।।

जाणोनी आम्हा पामरांचे मानस ।
रामनाथी प्रगटला जगन्नाथ ।। ४ ।।

हे अनादि अनंता, सच्चिदानंदा ।
उघडिता दोन्ही अक्ष (टीप), दिसावे तुझे निजरूप ।

आठवता स्वरूप, पळवी अवगुण कुरूप ।
अन् साकार व्हावे तुझे दिव्य स्वरूप ।। ५ ।।

टीप – डोळे’

– श्री. शिवराज पाटील, वेर्णा, फोंडा, गोवा. (२४.५.२०२३)