|

नवी देहली – कोरोना काळानंतर वर्ष २०२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये अचानक होणार्या मृत्यूंचे प्रमाण ११.६ टक्क्यांनी वाढले. देशभरातील एकूण गुन्ह्यांत घट झाली असली, तरी मुले आणि महिला यांच्याविषयीच्या गुन्ह्यांत मात्र वाढ झाली आहे. वर्ष २०२२ मध्ये एकूण ५८ लाख २४ सहस्र ९५६ गुन्हे नोंद झाले. वर्ष २०२१ च्या ६० लाख ९६ सहस्र ३१० च्या तुलनेत ही संख्या ४.५ टक्के अल्प आहे, अशी माहिती ‘राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागा’ने दिली. ही आकडेवारी वर्ष २०२२ मधील आहे.
सौजन्य इंडिया डेली लाईव
अहवालातील अन्य आकडेवारी !
१. वर्ष २०२२ मध्ये एकूण ६५ सहस्र ९८३ सायबर गुन्हे नोंदवले गेले. हे प्रमाण वर्ष २०२१ च्या तुलनेत २४ टक्क्यांनी अधिक आहे. वर्ष २०२१ मध्ये ५२ सहस्र ९७४ गुन्हे घडले होते. मुळात ही संख्याही वर्ष २०२० च्या तुलनेत ११.८ टक्क्यांनी अधिक होती.
२. वृद्धांसंदर्भातील गुन्ह्यांत ९.३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
३. देशात प्रत्येक घंट्याला महिलांविरुद्ध ५१ गुन्हे घडतात. वर्ष २०२२ मध्ये असे ४.४५ लाख गुन्हे नोंद झाले. वर्ष २०२१ च्या तुलनेत त्यांत ४ टक्के वाढ झाली. यांत १९.२ टक्के अपहरण, तर ७ टक्के अत्याचाराशी संबंधित गुन्हे आहेत. एकूण ३१ सहस्र ५१६ अत्याचारांच्या घटनांपैकी राजस्थानमध्ये सर्वाधिक ५ सहस्र ३९९ एवढे गुन्हे घडले. (आताच झालेल्या राजस्थान विधानसभेच्या निवडणुकीत कायदा-सुव्यवस्थेच्या अशा दुरवस्थेमुळेच जनतेने काँग्रेसला नाकारले, असे कुणी म्हटल्यास चूक ते काय ? – संपादक)
आत्महत्यांच्या घटनांत ४.२ टक्के वाढ !
देशात आत्महत्येचे प्रमाण ४.२ टक्क्यांनी वाढले. वर्ष २०२२ मध्ये १३ सहस्र विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. यामागे परीक्षेतील अपयश हे मुख्य कारण असल्याचे सांगण्यात आले. यातही महाराष्ट्रात सर्वाधिक, म्हणजे ३७८ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. |
संपादकीय भूमिका
|

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहराच्या प्रबोधनानंतर मुगाळी (गोवा) येथील रस्त्याच्या बाजूचा कचरा हटवला
पंढरपूर येथे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या ९ नगरसेवकांचा भाजपला पाठिंबा !
फहीमने ‘साहिल’ असल्याचे भासवून हिंदु तरुणीला अडकवले जाळ्यात : ओलीस ठेवून सामूहिक बलात्कार !
हवाईदलाचे विमान कोसळून ५ सैनिकांना वीरमरण
Mamata Banerjee FIR : बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद !
आतंकवाद्यांच्या पाठीराख्यांना सिंधु नदीचे पाणी मिळणार नाही ! : Defence Minister Rajnath Singh