गाझियाबादमध्ये एका मुसलमान दांपत्याची स्वेच्छेने घरवापसी !

आसिफ झाले आकाश चौहान, तर पत्नी सुमैया आता प्रिया म्हणून संबोधल्या जाणार !

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – जिल्ह्यातील एका मुसलमान दांपत्याने इस्लामचा त्याग करून घरवापसी केली. त्यामुळे पती आसिफने आकाश चौहान नाव धारण केले असून त्यांची पत्नी सुमैया खातून आता प्रिया नावाने ओळखली जाईल. या दांपत्याने येथील एका मंदिरात शंखनाद आणि वेदमंत्रपठण यांच्या वातावरणात ‘जय श्री राम’ म्हणत हिंदु धर्मात प्रवेश केला. या वेळी त्यांनी सनातन पद्धतीनुसार जीवन जगण्याचा संकल्प केला. घरवापसीचा हा कार्यक्रम हिंदु रक्षा दलचे अध्यक्ष श्री. पिंकी चौधरी यांनी आयोजित केला आहे.

सौजन्य Zee Uttar Pradesh UttaraKhand 

१. या संदर्भात श्री. पिंकी चौधरी म्हणाले की, आसिफ स्वत:च त्यांच्याकडे आले होते आणि त्यांनी हिंदु धर्म स्वीकारण्याची माझ्याकडे इच्छा व्यक्त केली. आसिफ आणि सुमैया ५ वर्षांपूर्वी विवाहबद्ध झाले असून त्यांना एक मूलही आहे.

२. आसिफ यांच्या विनंतीवरून २६ नोव्हेंबर या दिवशी चौधरी यांनी गाझियाबाद येथील भोपुरा क्षेत्रातील एका मंदिरात घरवापसी कार्यक्रम आयोजित केला होता.

३. या वेळी आकाश चौहान असलेले आसिफ म्हणाले, मला आधीपासूनच सनातन धर्म सर्वांत चांगला आणि पवित्र धर्म वाटायचा. इस्लाम हा काही धर्म नाही.

४. प्रिया चौहान झालेल्या सुमैया या वेळी म्हणाल्या की, हिंदु धर्मच सर्वश्रेष्ठ धर्म आहे. इस्लाममध्ये तीन वेळा तलाक म्हटले की, संबंध संपुष्टात येतात. आता माझे कुटुंब चांगले जीवन व्यतीत करू शकेल.

हिंदु धर्मात घरवापसी करण्यास इच्छुक असलेल्यांनी आम्हाला संपर्क साधावा ! – हिंदु रक्षा दल

या वेळी हिंदु रक्षा दलाचे अध्यक्ष श्री. पिंकी चौधरी म्हणाले की, देशभरात कुणालाही घरवापसी करायची असेल, तर त्यांनी आम्हाला संपर्क साधावा. आम्ही त्यांचे रक्षण आणि आदर यांचे संपूर्ण दायित्व घेऊ.

संपादकीय भूमिका 

कोणतीही बळजोरी न करता अन्य धर्मीय स्वत:हून हिंदु धर्म स्वीकारतात, हे हिंदु धर्माची अद्वितीय शिकवण आणि तत्त्वे यांमुळेच ! यातूनच हिंदु धर्माचे माहात्म्य लक्षात येते !