उत्तरकाशी येथे ४१ कामगार बोगद्यात अडकल्याचे आणि नंतर सुखरूप बाहेर पडल्याचे प्रकरण
उत्तरकाशी (उत्तराखंड) – येथील सिल्कियारा बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांची सुखरूप सुटका करण्यात आली. बोगद्याचा काही भाग कोसळल्याने गेल्या १७ दिवसांपासून आत अडकलेल्या ४१ कामगारांना २८ नोव्हेंबरच्या सायंकाळी उशिरा टप्प्याटप्प्याने बाहेर काढण्यात आले. १७ व्या दिवशी कामगार बाहेर येत असल्याचे पाहून त्यांच्या कुटुंबियांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांंनी या कामगारांची भेट घेतली. या वेळी केंद्रीय राज्यमंत्री जनरल (निवृत्त) व्ही.के. सिंह हेही तेथे उपस्थित होते. धामी यांनी बचावकार्यात गुंतलेल्या कामगार आणि सैनिक यांच्या मनोबलाचे आणि धैर्याचे कौतुक केले. स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, बाबा बौख नाग देवतेचा कोप झाल्याने ही दुर्घटना घडली आहे.
बाबा बौख नाग देवतेचा कोप झाल्याचे स्थानिकांचे मत !
बाबा बौख नाग देवतेचे मंदिर बांधकाम आस्थापनाने दीपावलीच्या काही दिवसांपूर्वी पाडले होते. त्या बदल्यात बांधकाम आस्थापनाने बोगद्याजवळ देवतेचे मंदिर बांधण्याचे आश्वासन दिले होते; परंतु वर्ष २०१९ पासून अद्याप मंदिर बांधलेले नाही. यासह गावकर्यांनी बांधलेले छोट मंदिरही बांधकाम आस्थापनाने तोडून टाकले होते. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा याची आठवण करून दिली होती; मात्र त्याकडे दुर्लक्ष केले गेले. यानंतर हा अपघात झाला. ‘हा देवाचाच कोप आहे’, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
पुजार्याने कामगारांच्या सुटकेसाठी केली प्रार्थना !
कामगारांना बाहेर काढण्याची सर्व व्यवस्था अयशस्वी झाल्यावर बांधकाम आस्थापनाच्या अधिकार्यांनी बाबा बौख नाग देवतेच्या पुजार्याची भेट घेऊन त्यांची क्षमा मागितली आणि पूजा करण्याची विनंती केली. पुजारी गणेश प्रसाद बिजलवान यांनी बोगद्यात पूजा केली आणि शंख फुकला. कामगारांना वाचवण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या मोहिमेला यश मिळावे, यासाठी त्यांनी प्रार्थना केली.
मंदिर न पाडण्याचा दिला होता सल्ला !
सिल्कियारा गावातील ४० वर्षीय धनवीर चंद रामोला म्हणाले, ‘‘प्रकल्प चालू होण्यापूर्वी बोगद्याच्या तोंडाजवळ एक छोटेसे मंदिर बांधण्यात आले होते. स्थानिक देवतेला प्रार्थना करून अधिकारी आणि कामगार बोगद्यात प्रवेश करत होते; तथापि काही दिवसांपूर्वी बांधकाम व्यवस्थापनाने मंदिर जागेवरून हटवले आणि लोकांचा असा विश्वास आहे की, यामुळेच हा अपघात झाला आहे.’’
स्थानिक देवतेचे छोटे मंदिर बांधण्याची आहे परंपरा !
आणखी एक गावकरी राकेश नौटियाल म्हणाले, ‘‘आम्ही बांधकाम आस्थापनाला मंदिर पाडू नका किंवा जवळपास दुसरे मंदिर बांधा, असे सांगितले होते; मात्र आस्थापनाच्या अधिकार्यांनी आमची अंधश्रद्धा असल्याचे सांगत आमची चेतावणी धुडकावून लावली.’’ याआधीही बोगद्यात काही भाग पडला होता; पण त्यात एकही कामगार अडकला नाही किंवा इतर कोणतेही हानी झाले नाही.’’
मुख्यमंत्री धामी आणि विदेशीतज्ञ यांनी केली पूजा
बाबा बौख नाग देवतेच्या कोपाची माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी आणि विदेशातून आलेले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे बोगदातज्ञ आर्नोल्ड डिक्स यांनी बाबा बौख नाग देवतेची पूजा केली केली.
पंतप्रधान मोदी यांनीही केले होते प्रार्थनेसाठी आवाहन !
बोगद्यात अडकलेल्या कामगारांसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी २७ नोव्हेंबर या दिवशी देशवासियांना केले होते.
संपादकीय भूमिकायाविषयी बुद्धीप्रामाण्यवाद्यांना काय म्हणायचे आहे ? |