
मुंबई – शहरातील कुर्ला येथील शांतीनगरमध्ये मेट्रो रेल्वेचे काम चालू असलेल्या ठिकाणी एका सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळलो. या प्रकरणी अज्ञाताच्या विरोधात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी या परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज पडताळण्यात येत आहेत.
१९ नोव्हेंबर या दिवशी दुपारी १२.३० वाजता पोलिसांना या सुटकेसविषयी माहिती मिळाली. मृत महिलेचे वय अनुमाने ३० ते ३५ वर्षे इतके आहे. मृतदेहाच्या एका हातावर त्रिशूळ आणि डमरू यांचे ‘टॅटू’ (यंत्राच्या सहाय्याने शरिरावर काढण्यात आलेली कलाकृती) आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. जून २०२३ मध्ये मुंबईला लागून असलेल्या पालघर जिल्ह्यातील मीरा-भाईंदर येथेही एका सुटकेसमध्ये महिलेचे डोके आढळले होते. मुंबईसह एकूणच महाराष्ट्रात क्रूरपणे होणार्या हत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे यावरून दिसून येते.
संपादकीय भूमिकाक्रूरपणे होणार्या हत्यांचे वाढते प्रमाण हे समाज संवेदनाहीन होत असल्याचे लक्षण आहे. वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी नैतिक शिक्षणाची नितांत आवश्यकता आहे ! |
अधिक भाडे आकारणार्या ९ सहस्र १५८ खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाई !
प्रत्येक महिन्याला राज्य महिला आयोगाकडे दीड सहस्रांहून अधिक तक्रारी !
मराठी भाषेच्या अशुद्ध उच्चारांविषयी विधानसभेच्या अध्यक्षांची दिलगिरी !
सिया गोयल आणि तिच्या प्रियकराला २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी !
प्रत्येक गावात हवामान केंद्र उभारणार !
वणवे रोखण्यासाठी ऑस्ट्रेलियातील पद्धतीचा अभ्यास करणार ! – वनमंत्री गणेश नाईक