रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमात ‘साधनावृद्धी’शिबिराच्‍या कालावधीत जाणवलेली वैशिष्‍ट्यपूर्ण सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती

‘जुलै २०२३ मध्‍ये रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमात झालेल्‍या ‘साधनावृद्धी’च्‍या शिबिरामध्‍ये ‘साधक बनवण्‍यासाठी करावयाचेे प्रयत्न’, या विषयीचे सत्र चालू होते. त्‍या वेळी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ म्‍हणाल्‍या, ‘‘तुम्‍हाला डोळे बंद करून काय अनुभवायला मिळते, ते अनुभवा !’’ त्‍या वेळी मला पुढीलप्रमाणे जाणवले.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ
श्री. मिनेश पुजारे

अ. ‘संपूर्ण सभागृहात पोकळी निर्माण झाली आहे. त्‍या पोकळीत आमचीच स्‍पंदने आम्‍हाला अनुभवायला मिळत आहेत. पोकळीत पुष्‍कळ प्रमाणात चैतन्‍य निर्माण झाले असून ते माझ्‍या सहस्रारामधून माझ्‍या देहात जात आहे’, असे मला जाणवले.

आ. मला चैतन्‍यामुळे माझ्‍या सहस्रार, तसेच आज्ञा, विशुद्ध आणि अनाहत इत्‍यादी चक्रांमध्‍ये स्‍पंदने जाणवत होती.

इ. माझ्‍या अंगावर रोमांच येऊन ‘माझा देह हवेत अलगद तरंगत आहे’, असे मला जाणवले.

ई. माझ्‍या मनाला पुष्‍कळ शांतता वाटली आणि मला स्‍थिरता अनुभवता आली.

उ. मला अनाहतचक्राजवळ पुष्‍कळ थंड वाटत होते. ही स्‍थिती मला सलग ५ मिनिटे अनुभवता आली.

ऊ. सुश्री (कु.) प्रियांका लोणेताईंच्‍या भावामुळे वातावरणात हलकेपणा आला. ही भावाची स्‍पंदने मलाही जाणवली आणि माझी भावजागृती होऊ लागली.

हे सर्व श्री गुरुदेवांच्‍या (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या) कृपेने मला अनुभवता आले. त्‍याबद्दल त्‍यांच्‍या चरणी कोटीश: कृतज्ञता !’

– श्री. मिनेश पुजारे, सोलापूर (२६.७.२०२३)