जळगाव, १२ नोव्हेंबर (वार्ता.) – जिल्ह्यातील धरणगाव शहरात ८ नोव्हेंबर या दिवशी मुसलमान समाजाची रॅली निघाली होती. त्यात धर्मांधांनी ‘हमास’ या आतंकवादी संघटनेच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या, तसेच हमासचे झेंडे फडकवले. या वेळी भारतविरोधी घोषणाही देण्यात आल्या. तेथे पोलीस बंदोबस्त होता. पोलीस निरीक्षक स्वतः उपस्थित होते. (धर्मांधांच्या देशद्रोही कृत्यांकडे डोळेझाक करणारे पोलीस ! हिंदूंच्या कार्यक्रमात कायद्याची भाषा करणारे पोलीस अशा ठिकाणी निष्क्रीय होतात, हे लक्षात ठेवा ! – संपादक) यातील देशद्रोही कृत्ये करणार्या धर्मांधांविरोधात गुन्हे नोंदवण्याची मागणी राष्ट्रीय सुरक्षा मंचच्या वतीने निवेदनाद्वारे पोलीस निरीक्षकांकडे करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, वरील सर्व प्रकार हा बंदोबस्तात असलेल्या पोलिसांसमक्ष घडलेला आहे, ही अतिशय लाजिरवाणी, निंदनीय, तसेच धोकादायक गोष्ट आहे. पोलीस प्रशासनाने समाजकंटकांविरुद्ध ३ दिवस उलटूनही कुठलीही कायदेशीर कारवाई केलेली नाही. तरी त्यांच्या विरोधात तात्काळ कठोर कारवाई करावी.