एर्नाकुलम् (केरळ) – येथे एका मुसलमानेतर मुलाशी बोलल्याने फातिमा नावाच्या मुलीची तिचा पिता अबीज महंमद याने हत्या केली. महंमद हा अभियंता असून त्याला त्याच्या मुलीने संबंधित मुलाशी बोललेले आवडायचे नाही. २९ ऑक्टोबर या दिवशी ती मुसलमानेतर मुलाशी भ्रमणभाषवरून बोलत असल्याचे लक्षात आल्यावर महंमदने रागाच्या भरात तिला लोकंडी रॉडने अमानुष मारहाण केली. नंतर बळजोरीने तिच्या तोंडात विष घातले. यामुळे तिला तातडीने रुग्णालयात हालवण्यात आले; परंतु ७ नोव्हेंबर या दिवशी तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी फातिमाच्या आईनेच वडिलांच्या विरोधात पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून महंमदला अटक केली.
१४ वर्षीय फातिमा बारावीत शिकणार्या एका मुसलमानेतर मुलाशी बोलत असे. यावरून २९ ऑक्टोबरला तिच्या वडिलांनी तिला मारहाण केली. या वेळी तिच्या आईने वडिलांना थांबवण्याचा प्रयत्न केला होता.
संपादकीय भूमिका‘लव्ह जिहाद’ला विरोध करणार्या हिंदुत्वनिष्ठांना ‘प्रेमाला धर्माचे बंधन नसते’, असे उपदेशाचे डोस पाजणारे पुरो(अधो)गामी आता गप्प का ? |