‘मराठा क्रांती मोर्चा’ आणि ‘सकल मराठा समाजा’तील कार्यकर्त्यांचा समावेश !
पुणे – मराठा आरक्षणासाठी मुंबई-बेंगळुरू बाह्यवळण महामार्गावर नवले उड्डाणपुलाजवळ आंदोलन केल्याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी ५०० जणांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. यात रवी पडवळ, प्रशांत पवार, निखिल पानसरे, योगेश दसवडकर आदींचा समावेश आहे. शहरामध्ये जमावबंदीचा आदेश लागू असतांना त्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलीस हवालदार नितीन खुटवड यांनी या संदर्भात सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती. हे आंदोलन ‘मराठा क्रांती मोर्चा’ आणि ‘सकल मराठा समाज’ यांच्याकडून करण्यात आले होते.
३१ ऑक्टोबर या दिवशी दुपारी १२ वाजता नवले उड्डाणपुलाजवळ कार्यकर्ते गोळा झाले. त्यांनी रस्त्यावर टायर पेटवल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती.