१. कोल्हापूर
१ अ. सौ. लता शिंदे
१. ‘भक्तीसत्संगामुळे मला प्रत्येक दिवशी देवीचे दर्शन होत होते.
२. मला सत्संगात पुष्कळ काही शिकायला मिळाले. या ९ दिवसांत घरातील वातावरण आनंदी होते.’
१ आ. सौ. स्वाती गजबर
१. ‘नवरात्रीचे ९ दिवस मला श्री महालक्ष्मीचे वेगवेगळ्या रूपांत दर्शन झाले. त्या कालावधीत माझा नामजप अखंड चालू होता.’
१ इ. श्री. गणेश कार्वेकर
१. ‘देवी लवकरच हिंदु राष्ट्राची पहाट घेऊन येणार आहे’, असे मला वाटले.
२. मला देवीच्या विराट रूपाचे आणि ब्रह्मा-विष्णु-महेश यांचे दर्शन झाले.’
१ ई. श्री. आनंद माने, सांगवडे, जिल्हा कोल्हापूर.
१. ‘साक्षात् आदिशक्ती जगदंबाच श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या मुखातून बोलत आहे आणि देवीचे चैतन्य त्यांच्या वाणीतून पसरत आहे’, असे मला जाणवत होते. त्यामुळे माझे मन शांत आणि आनंदी झाले.
२. भक्तीसत्संग ऐकायला लागल्यापासून माझा श्री भवानीदेवीचा नामजप भावपूर्ण होतो. पहाटे झोपेत माझा नामजप सतत चालू असतो.
३. माझ्याकडून ‘माझे सर्व प्रकारचे भय, स्वभावदोष आणि अहं नष्ट कर’, अशी आदिशक्ती जगदंबादेवीला प्रार्थना झाली. त्या वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचा तेजस्वी चेहरा माझ्या डोळ्यांसमोर दिसला आणि माझ्या अंगावर शहारे आले.
आदिशक्ती जगदंबा, भगवान श्रीकृष्ण आणि विष्णुस्वरूप गुरु यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
१ उ. सौ. आरती बजरंग होनमाने, इचलकरंजी, जिल्हा कोल्हापूर.
१. ‘मी भक्तीसत्संग नियमितपणे ऐकत होते. सत्संग ऐकतांना माझी भावजागृती होत असे. ‘सत्संग ऐकतच रहावा’, असे मला वाटत असे.
२. ‘प्रत्यक्ष कुलदेवी आपल्या घरी आली आहे आणि मी तिच्या चरणांवर फूल वहात आहे’, असे मला जाणवत होते.’
१ ऊ. सौ. पुष्पा विठ्ठल यंगारे, इचलकरंजी, जिल्हा कोल्हापूर.
१. ‘भक्तीसत्संग ऐकत असतांना मला आमच्या घरात शंखध्वनी ऐकू येत होता.’
१ ए. श्रीमती प्रीती गिलडा, इचलकरंजी, जिल्हा कोल्हापूर.
१. ‘अष्टमीच्या दिवशी मला स्वप्नात कुलदेवी आणि विठ्ठल यांचे दर्शन झाले. असे दर्शन मला पहिल्यांदाच झाले.’
१ ऐ. श्री. विनोद ओझा, इचलकरंजी, जिल्हा कोल्हापूर.
१. ‘नवरात्रीचे भक्तीसत्संग ऐकत असतांना मला प्रत्यक्ष कुलदेवतेचे दर्शन होत होते आणि दिवसभर तिचे अस्तित्व जाणवत होते.
२. त्या कालावधीत ‘देवी आपल्या समवेत आहे’, असे वाटून माझे मन पुष्कळ उत्साही आणि आनंदी असायचे.’
२. पुणे
२ अ. सौ. मंजुळा ठोकळे
१. ‘नवरात्रीच्या कालावधीतील भक्तीसत्संग मला पुष्कळ मनापासून आणि एकाग्रतेने अनुभवता आले.
२. दसर्याच्या दिवशी भक्तीसत्संग ऐकत असतांना प्रथम माझ्या शरिरातील उष्णता पुष्कळ वाढली; पण नंतर मला गारवा जाणवला. त्या वेळी मला देवीची कृपा अनुभवता आली.’
३. मुंबई
३ अ. सौ. शिल्पा मनोहर दळवी
१. ‘माझ्याकडून प्रतिदिन श्री भवानीदेवी आणि श्री दुर्गादेवी यांचा नामजप चांगला होत होता.’
४. बेळगाव
४ अ. कु. विधाता विश्वनाथ देसाई, मरढीमठ, तालुका गोकाक, जिल्हा बेळगाव.
१. ‘प्रतिदिन भक्तीसत्संग ऐकत असतांना मला चैतन्य जाणवत होते आणि आनंदी वाटत होते.’
(सर्व सूत्रांचा दिनांक : १५.१०.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |