देहली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल यांचा देहली पोलिसांना नोटीस बजावून कारवाई करण्याचा आदेश !
नवी देहली – हिंदूंच्या देवतांची अश्लील चित्रे ऑनलाईन विकली जात असल्याच्या प्रकरणी देहली महिला आयोगाने देहली पोलिसांना नोटीस बजावून कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. यासह आयोगाने या कारवाईचा अहवाल सादर करण्याचाही आदेश दिला आहे. आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालिवाल यांनी देहली पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेच्या उपायुक्तांकडे १ नोव्हेंबरपर्यंत या संदर्भात गुन्हा नोंदवल्याची प्रत सादर करण्यास सांगत ‘या प्रकरणी कुणाला अटक केली ?, याची माहितीही मागितली आहे. जर आतापर्यंत कुणाला अटक झाली नसेल, तर याचे कारण सादर करण्यासही मालिवाल यांनी सांगितले आहे. संकेतस्थळांवरून ही चित्रे हटवण्यासाठी आणि ती प्रसारित होण्यापासून थांबवण्यासाठी काय करण्यात येत आहे ?, याचा आढावाही मागितला आहे.
१. आयोगाकडे या संदर्भात एका व्यक्तीने तक्रार केली होती. यानंतर पोलिसांना नोटीस बजावण्यात आली होती. याविषयी अध्यक्षा स्वाती मालिवाल यांनी सांगितले की, हे अत्यंत अवमानकारक आहे. यामुळे धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. या प्रकरणी त्वरित गुन्हा नोंदवून आरोपींना अटक केली पाहिजे आणि संकेतस्थळांवरून ती चित्रे हटवली पाहिजेत.
२. देहली पोलिसांच्या विशेष शाखेच्या अधिकार्यांनी सांगितले की, आमच्याकडे तक्रारीचा ईमेल आला आहे. आम्ही तक्रार करणार्याला संपर्क केला आहे. आम्ही त्याच म्हणणे नोंदवून संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंदवणार आहेत. ईमेल समवेत जी माहिती देण्यात आली आहे, त्यानुसार अन्वेषण चालू करण्यात आले आहे. संकेतस्थळांवरील चित्रे आम्ही हटवू.
संपादकीय भूमिका
|