पुणे – खराडी येथील ‘गेरा स्कायव्हिला’ या सोसायटीमधील जैन मंदिरातील दानपेटी फोडून १० सहस्र रुपयांची चोरी झाल्याचा प्रकार २८ ऑक्टोबर या दिवशी उघड झाला. या प्रकरणी मंदिराचे विश्वस्त भावेश जैन यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. चोरट्यांनी मंदिराच्या खिडकीतून प्रवेश करत अर्पण पेटी फोडल्याचे दिसून आले.