पंतप्रधान मोदी यांचे ‘मन की बात’द्वारे आवाहन !
नवी देहली – दिवाळीचा सण काही दिवसांवर येत आहे. मी माझ्या देशवासियांना केवळ ‘मेड इन इंडिया’ वस्तू खरेदी करण्याचे आवाहन करतो. स्थानिक कलाकारांनी बनवलेली उत्पादने अवश्य खरेदी करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरील त्यांच्या ‘मन की बात’ या मासिक कार्यक्रमाद्वारे भारतियांना केले. या कार्यक्रमाचा १०६ वा भाग २९ ऑक्टोबरला सकाळी प्रक्षेपित करण्यात आला.
“Like every time, this time too, in our festivals, our priority should be ‘Vocal for Local’ and let us together fulfill that dream, our dream is ‘Atmanirbhar Bharat’. Today India is becoming the biggest manufacturing hub of the world,” says PM Modi in the 106th episode of Mann… pic.twitter.com/lADczaobc4
— ANI (@ANI) October 29, 2023
पंतप्रधान पुढे म्हणाले की, देशवासियांच्या घामाचा सुगंध असलेल्या वस्तूंनी आपले घर सजवा. स्थानिकांना प्राधान्य हे केवळ सणांपुरते मर्यादित नसावे. ही भावना केवळ दिवाळीपुरती मर्यादित राहू नये. उत्पादने खरेदी करतांना कृपया ऑनलाईन पैसे द्या. तुम्ही जेव्हाही पर्यटनासाठी एखाद्या शहरात किंवा तीर्थक्षेत्री जाल, तेव्हा स्थानिक कलाकारांनी बनवलेली उत्पादने नक्कीच खरेदी करा. तुमच्या प्रवासाच्या निधीचा अधिकाधिक भाग स्थानिक वस्तूंवर खर्च करा.