दु:खद गीत ऐकल्याने लोकांच्या शारीरिक वेदना अल्प होऊ शकतात ! – कॅनडातील मॅकगिल विश्‍वविद्यालयाचे संशोधन

कॅनडातील मॅकगिल विश्‍वविद्यालयाने केलेल्या संशोधनाचा निष्कर्ष !

मॉन्ट्रियल (कॅनडा) – सुख आणि दु:ख दोन्हींचे कटू अन् भावनात्मक अनुभव यांचे विवरण असणारे दु:खद गीत ऐकल्याने लोकांच्या शारीरिक वेदना अल्प होऊ शकतात, असा निष्कर्ष येथील मॅकगिल विश्‍वविद्यालयाने संशोधनाअंती काढला.

१. या संशोधनात सहभागी लोकांना त्यांच्या आवडीची गाणी ऐकवण्यात आली होती. यातून संशोधकांना आढळले की, दुःखद गाणी ऐकणार्‍यांमध्ये वेदनेची जाणीव १० टक्क्यांपर्यंत अल्प झाली. याचे कारण मेंदूद्वारे गीतांतून निर्माण होणारी संवेदना वेदनेच्या संकेतांच्या तुलनेत अधिक प्राधान्य देते. शरीर वेदनेची जाणीव करून देते; मात्र आपल्या चेतना मनाला वेदनेची जाणीव करून देणारे संदेश प्रसारित करत नाही.

२. संगीत तणाव, हृदय गती, रक्तदाब अल्प करणे आणि मेंदूत डोपामाइन हार्मोन उत्पादनाला प्रोत्साहन देऊन चिंता आणि नैराश्याच्या भावना दूर करण्यात साहाय्य करते. संगीताने चांगली झोप आणि सहनशक्ती यांत वाढही होते.

संपादकीय भूमिका

कुठे दुःखी व्यक्तीला दुःखातून बाहेर येण्यासाठी गीत ऐकवण्यासारखे वरवरचे उपाय सांगणारे पाश्‍चात्त्यांचे संशोधन, तर कुठे मानवाला सत्चित्आनंदाकडे वाटचाल करायला शिकवणारा हिंदु धर्म !