Himanta Biswa Sarma on Akbar : ‘अकबरा’वर टिप्पणी केल्यावरून आसामचे मुख्यमंत्री सरमा यांना निवडणूक आयोगाकडून नोटीस !

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

गौहत्ती (आसाम) – छत्तीसगडमध्ये पुढील मासात असणार्‍या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात प्रचार चालू असून आसामचे भाजपचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी केलेल्या एका टिप्पणीवरून त्यांना निवडणूक आयोगाकडून ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावण्यात आली आहे.

१. सरमा कवर्धा येथील एका प्रचार सभेला संबोधित करतांना म्हणाले होते, ‘कुठे एखादा अकबर आला, तर १०० अकबरांना बोलावतो. त्यामुळे जेवढे लवकर शक्य आहे, तेवढ्या लवकर त्याला परत पाठवायला हवे, अन्यथा माता कौशल्यची भूमी अपवित्र होईल.’ माता कौशल्येची जन्मभूमी ही छत्तीसगडमध्ये असल्याचे म्हटले जाते. महंमद अकबर या एकमेव काँग्रेसी मुसलमान मंत्र्याच्या विरोधात सरमा यांनी वरील वक्तव्य केले होते.

२. छत्तीसगड राज्यात ९० सदस्य असणार्‍या विधानसभेत ७ आणि १७ नोव्हेंबर या दिवशी दोन टप्प्यांत निवडणुका होणार आहेत. ३ डिसेंबर या दिवशी मतमोजणी असणार आहे.