‘१५.१०.२०२३ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘काली याग’ पार पडला. त्या वेळी मला आलेली अनुभूती येथे दिली आहे.
१. यज्ञकुंडातून येणारा धूर श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या दिशेने जाणे आणि त्यांनी लाल रंगाची साडी परिधान केली असूनही साडीचा रंग गुलाबी दिसणे, त्याच वेळी बाजूला बसलेल्या सहसाधिकेलाही साडी गुलाबी दिसणे : ‘काली याग चालू असतांना यज्ञकुंडातून येणारा धूर श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या दिशेने जात होता. तेव्हा मला त्यांच्या साडीचा रंग गुलाबी दिसत होता. प्रत्यक्षात त्यांनी काली यागासाठी लाल रंगाची साडी परिधान केली होती. त्या वेळी मी माझ्या बाजूला बसलेली साधिका कु. श्रद्धा लोंढे हिला विचारले, ‘‘तुला श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या साडीचा रंग गुलाबी दिसत आहे का ?’’ तिच्या मनातही तोच विचार आला होता. यावरून ‘आम्हा दोघींनाही देवानेच हा विचार दिला आहे’, हे माझ्या लक्षात आले.
२. यज्ञातील धूर श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या दिशेने गेल्यावर त्यांचीही लाल रंगाची साडी गुलाबी दिसू लागली.
३. साडीचा रंग गुलाबी दिसण्यामागील कारणमीमांसा : दुसर्या दिवशी मी श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांना ही अनुभूती सांगितली. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘आम्हा दोघींकडून प्रक्षेपित होणार्या प्रीतीमुळे तुम्हाला साड्यांचा रंग गुलाबी दिसत होता.’’
महर्षींच्या कृपाशीर्वादामुळे हे दशमहाविद्या यज्ञ अनुभवता येत आहेत. ही अनुभूती दिल्याबद्दल सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या चरणी कृतज्ञता !’
– कु. वैदेही शिंदे, फोंडा, गोवा. (१६.१०.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |