१. यज्ञात हिना अत्तराची आहुती देण्यापूर्वी हिना अत्तराचा तीव्र सुगंध येणे आणि यज्ञात हिना अत्तराची आहुती दिल्यानंतर ‘त्याचा सुगंध अनाहतचक्रात जाऊन देहाची शुद्धी झाली’,असे जाणवणे
‘५.१०.२०२२ या दसर्याच्या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या यज्ञाच्या पूर्णाहुतीला मला यज्ञस्थळी उपस्थित रहाण्याची संधी मिळाली. यज्ञ चालू असतांना मला हिना अत्तराचा तीव्र सुगंध आला. नंतर काही क्षणांत यज्ञात हिना अत्तराची आहुती देण्यात येणार असल्याचे सांगितले.
यज्ञात अत्तराची आहुती दिल्यानंतर त्याचा सुगंध माझ्या अनाहतचक्रात जाऊन माझ्या देहाची शुद्धी झाली’,असे मला जाणवले.
२. साधक भवानीदेवीच्या गोंधळाचे गीत म्हणत असतांना ‘आश्रमातील भवानीदेवीच्या मूर्तीतील देवी यज्ञस्थळी आली’, असे जाणवणे
यज्ञ झाल्यानंतर गायन सेवेच्या वेळी साधक भवानीदेवीच्या गोंधळाचे गीत सादर करत असतांना क्षणभर माझे डोळे बंद झाले. त्या वेळी ‘साधकांची हाक ऐकून आश्रमातील भवानीदेवीच्या मूर्तीतील देवी यज्ञस्थळी आली’, असे मला जाणवले.’
– श्री. अमोल कुळवमोडे, उचगाव, कोल्हापूर. (१९.१०.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |