‘वर्ष २०१९ मध्ये माझ्या शारीरिक त्रासांचे प्रमाण वाढल्यामुळे मला सेवेसाठी प्रवास करणे अशक्य झाले. त्यामुळे मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात राहून सेवा करू लागलो. तेव्हापासून मी ध्वनीचित्रीकरणाच्या संदर्भात सेवा करत आहे. या कालावधीत मला या सेवेचे स्वरूप आणि सहसाधकांची गुणवैशिष्ट्ये शिकायला मिळाली. ती पुढे दिली आहेत. १९.१०.२०२३ या दिवशी आपण काही गुणवैशिष्ट्ये पाहिली. आज पुढील भाग पाहूया
२. चित्रीकरणाची सेवा करतांना सहसाधकांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !
२ क. प्रत्येक प्रसंगामध्ये शांत आणि स्थिर राहून साधकांच्या सेवांचे नियोजन करणारे श्री. मेहुल राऊत ! : श्री. मेहुल यांच्याविषयी मला जवळीक वाटते. त्यांच्यामध्ये मला ‘नियोजनकुशलता आणि मनमिळाऊपणा’, हे २ गुण प्रामुख्याने जाणवतात. प्रसंगांमध्ये शांत आणि स्थिर राहून साधकांचे सेवांसाठीचे नियोजन करणे, ही सेवा ते सातत्याने करत आहेत. ‘कोणत्या साधकांना कोणत्या सेवेसाठी पाठवायचे ?’, याचे नियोजन ते चांगल्या प्रकारे करतात. त्यांची आश्रमातील बहुतेक सर्वच साधकांशी जवळीक आहे. सेवेच्या अनुषंगाने कितीही कठीण स्थिती असली, तरी ते साधकांशी प्रेमाने बोलतात आणि परिस्थितीला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करतात.
२ ख. शांत, स्थिर आणि तत्त्वनिष्ठ राहून साधकांना प्रेमाने चुका सांगणारे ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. दिनेश शिंदे ! : श्री. दिनेश शिंदे यांना आम्ही सर्व जण ‘दिनेशदादा’ म्हणतो. दादा आम्हा साधकांमध्ये सर्वच दृष्टींनी ज्येष्ठ आहेत. ते संस्थेच्या स्थापनेपासून आणि प्रत्यक्ष गुरुदेवांच्या मार्गदर्शनाखाली शिकलेले असल्यामुळे त्यांच्याकडून पुष्कळ शिकण्यासारखे आहे. दादांचे गुण म्हणजे शांत, स्थिर आणि तत्त्वनिष्ठ असणे. पुष्कळ वेळा चित्रीकरणाच्या वेळी साधकांची धावपळ चालू असते. अशा वेळी दादा शांतपणे त्यांच्याकडे असलेली सेवा पूर्ण एकाग्रतेने करत असतात. त्यामुळे ते करत असलेल्या सेवेत चुका रहात नाहीत. दादा कधीच रागावत नाहीत. ‘सेवा योग्य पद्धतीने आणि ठरलेल्या कार्यपद्धतीनुसार व्हाव्यात’, असे त्यांचे म्हणणे असते. त्यामुळे ते तत्त्वनिष्ठ राहून साधकांना त्यांच्याकडून होत असलेल्या चुकाही प्रेमाने सांगतात. (क्रमश:)
– श्री. सत्यकाम कणगलेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.१०.२०२१)
‘श्री. सत्यकाम कणगलेकर यांनी ध्वनीचित्रीकरण विभागातील साधकांसंदर्भात जी माहिती दिली आहे, तिच्यावरून मला साधकांसंदर्भात ‘ते किती वैशिष्ट्यपूर्ण आहेत,’ ही माहिती ज्ञात झाली. त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले |