…तर जगभरातील मुसलमानांना कुणी रोखू शकणार नाही ! – आयतुल्ला खामेनेई, इराण

गाझा पट्टीवरील आक्रमणावरून इराणची इस्रायलला धमकी !

इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला खामेनेई यांनी दिली धमकी !

तेहरान (इराण) – जर गाझा पट्टीमध्ये इस्रायलकडून आक्रमण चालू रहाणार असेल, तर जगभरातील मुसलमान आणि इराणचे सैन्य यांना कुणी रोखू शकत नाही, अशी धमकी इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला खामेनेई यांनी दिली आहे.

यापूर्वी इराणचे परराष्ट्रमंत्री होसैन अमीराबदोल्लाहियान यांनी धमकी देतांना म्हटले होते की, इस्रायलला गाझा पट्टीमध्ये भूमीवरून कारवाई करण्याची अनुमती दिली जाऊ शकत नाही. जर इस्रायलने असे केले, तर त्याला त्याचे परिणाम भोगावे लागतील. येणार्‍या काही घंट्यांमध्ये इराणकडून व्यापक स्तरावर कारवाई होऊ शकते. आमच्यासाठी सर्व दरवाजे उघडे आहेत. गाझा पट्टीतील लोकांच्या विरोधात होणार्‍या या युद्ध गुन्ह्याच्या संदर्भात आम्ही उदासीन राहू शकत नाही. इराणचे सैन्य अधिक काळापर्यंत युद्ध करू शकतो.

इराणकडून असे सांगण्यात आले, तरी इराणकडून नेमकी कशी कारवाई करण्यात येणार आहे, हे स्पष्ट करण्यात आलेले नाही.

संपादकीय भूमिका 

मुसलमानांसाठी जगभरातील देश एकत्र येतात, तर हिंदूंसाठी भारतातील हिंदूही कधी एकत्र येत नाहीत !