तेल अविव (इस्रायल) – इस्रायलवर लेबनॉनमधील आतंकवादी संघटना हिजबुल्लाने पुन्हा एकदा आक्रमण केले आहे. हिजबुल्ला ठराविक काळाने इस्रायलवर आक्रमण करत आहे. या आक्रमणानंतर इस्रायलने हिजबुल्लावर प्रत्युत्तरादाखल आक्रमण केले आहे.
हिजबुल्लाने इस्रायलच्या सीमेवरील शुटूल शहरावर ३ ड्रोनद्वारे आक्रमण केले. तेथे मोर्टार (मोठे तोफगोळे) आणि क्षेपणास्त्र डागण्यात आले. यात इस्रायलचे ३ सैनिक गंभीररित्या घायाळ झाले. हिजबुल्लाने दावा केला आहे की, या आक्रमणात इस्रायलचे २ नागरिक ठार झाले आहेत.