गडचिरोली : कांकेर-गडचिरोली सीमाभागातील पोलीस ठाण्यावर पाळत ठेवून मोठा घातपात घडवण्याच्या सिद्धतेत असलेला जहाल नक्षलवादी चैनुराम उपाख्य सुक्कू वत्ते कोरसा (वय ४८ वर्षे) याला अटक करण्यात आली. त्याच्यावर १६ लाख रुपयांचे पारितोषिक होते.
गडचिरोली पोलिसांना छत्तीसगड सीमेवरील जंगल परिसरात संशयास्पद व्यक्ती पाळत ठेवून असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली. पोलिसांच्या नक्षलविरोधी विशेष पथकाने अभियान राबवून वरील कारवाई केली. अटक करण्यात आलेला नक्षलवादी चैनुराम याच्यावर सीमाभागात कार्यरत दलमला स्फोटके आणि इतर साहित्य पुरवण्याचे दायित्व होते. मागील वर्षभरात त्याने या भागातील नक्षलवाद्यांना मोठ्या प्रमाणात स्फोटके पुरवल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
संपादकीय भूमिकानक्षलवादाचे समूळ उच्चाटन होण्यासाठीच सरकारने प्रयत्न करावेत ! |