आज ‘सर्वपित्री अमावास्या’आहे. त्या निमित्ताने…
पितृपक्षातील (भाद्रपद मासातील) अमावास्येला हे नाव आहे. या तिथीला कुळातील सर्व पितरांना उद्देशून श्राद्ध करतात. वर्षभरात नेहमी आणि पितृपक्षातील इतर तिथींना श्राद्ध करणे जमले नाही, तरी या तिथीला सर्वांनी श्राद्ध करणे अत्यंत आवश्यक आहे; कारण पितृपक्षातील ही शेवटची तिथी आहे. अमावास्या ही श्राद्ध करण्यास अधिक योग्य तिथी, तर पितृपक्षातील अमावास्या ही सर्वाधिक योग्य तिथी आहे, असे शास्त्रात सांगितले आहे. या दिवशी बहुतेक सर्व घरांतून किमान एक तरी ब्राह्मण भोजनाला बोलावतात. कोळी, ठाकूर, कातकरी, कुणबी आदी जातींत पितरांच्या उद्देशाने या दिवशी भाताचे अथवा पिठाचे पिंड देतात आणि आपल्याच जातीतील काही लोकांना जेवायला घालतात. यांच्यात या दिवशी ब्राह्मणांना शिधा देण्याचीही रूढी आहे.
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘श्राद्धाचे महत्त्व आणि शास्त्रीयविवेचन’)