साऊदी अरेबियात काबा मशिदीसमोर ‘भारत जोडो यात्रे’चा प्रचार केल्यावरून ९९ कोड्यांची आणि ८ मास कारागृहाची शिक्षा !

काँग्रेसच्या मुसलमान कार्यकर्त्याला काँग्रेसप्रेम पडले महागात !

नवी देहली – रझा कादरी नावाच्या काँग्रेसच्या एका मुसलमान कार्यकर्त्याने जानेवारी २०२३ मध्ये साऊदी अरेबियात काबासमोर राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रे’चा प्रचार केला होता. यावरून कादरी यांना अटक करून ८ मास कारागृहात अत्यंत हलाखीच्या स्थितीत ठेवण्यात आले होते. यासह त्यांना ९९ कोडे मारण्याची शिक्षाही देण्यात आली होती.

ए 18 तेलंगणा न्यूज 

कादरी ४ ऑक्टोबर या दिवशी भारतात परतले असून त्यांनी सांगितले की, तेथील कारागृहात भारतियांना सर्वांत घाणेरड्या ठिकाणी ठेवले जाते. कादरी मध्यप्रदेशातील निवाडी जिल्ह्यात युवक काँग्रेसचे नेते आहेत. त्यांनी मक्केची मशीद अल् हरममध्ये काबासमोर भारत जोडो यात्रेचे भित्तीपत्रक झळकवले होते. याचे छायाचित्र काढून त्यांनी सामाजिक माध्यमांतून ते प्रसारितही केले. यावरून त्यांना अटक करण्यात आली होती.