हिंदु धर्मात सांगितल्‍यानुसार ‘पितृपक्षात श्राद्धकर्म करणे किती महत्त्वाचे आहे ?’, याविषयी साधकाला आलेली प्रचीती !

श्री. अविनाश जाधव

१. पितृपक्षाच्‍या कालावधीत झालेले त्रास

‘सप्‍टेंबर २०२२ मध्‍ये पितृपक्ष चालू झाल्‍यावर ‘माझ्‍या आध्‍यात्मिक त्रासात वाढ झाली आहे’, असे मला जाणवले. त्‍या कालावधीत मला ‘रात्री लवकर झोप न लागणे, ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप आणि अन्‍य नामजपादी उपाय करूनही आवरण जाणवणे आणि सेवा न सुचणे, असे त्रास होत होते.

२. रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात श्राद्धविधी करणे

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात भाद्रपद कृष्‍ण द्वादशीला मी श्राद्धविधी केले. आश्रमात पुरोहित साधकांकडून श्राद्धविधी पुष्‍कळ भावपूर्णरित्‍या करण्‍यात आले. श्राद्धविधी करतांना ‘पितरांना वर्षभर पुरेल एवढे अन्‍न ग्रहण करता आले’, असे मला जाणवत होते.

३. श्राद्धविधी केल्‍यावर झालेले लाभ

त्‍यानंतर मला होत असलेले त्रास आपोआप उणावले. मला उत्‍साह वाटू लागला. माझ्‍याकडून सेवाही तप्‍तरतेने आणि वेळेत होऊ लागल्‍या. मी नामजपादी उपाय थोडाच वेळ करूनही ‘नामजपादी उपाय पूर्ण झाले आहेत’, असे मला जाणवत असे. तेव्‍हा ‘पितृपक्षात श्राद्धकर्म करणे किती महत्त्वाचे आहे ?’, याची मला जाणीव झाली.’

– श्री. अविनाश जाधव (आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.१०.२०२२)