गाझा पट्टी (पॅलेस्टाईन) – इस्रायलच्या सैन्याने ११ ऑक्टोबर या दिवशी गाझा पट्टीतील अल् फुरकान क्षेत्रात आक्रमण करत हमासचा सैन्यप्रमुख महंमद दीफ याच्या वडिलांच्या घरालाच लक्ष्य केले. या आक्रमणात दीफचे वडील, भाऊ आणि मुले यांच्यासह कुटुंबातील अन्य सदस्यही मारले गेले, अशी माहिती इस्रायली सैन्याने दिली.
महंमद दीफ हा पायाने अधू असून वर्ष २००२ पासून हमासच्या सैन्याचा प्रमुख आहे, तसेच इस्रायलचा ‘मोस्ट वाँटेड’ आतंकवादी आहे. इस्रायलची गुप्तचर संघटना ‘मोसाद’ने त्याला आतापर्यंत अनेक वेळा मारण्याचा प्रयत्न केला आहे; परंतु तिला यात यश आलेले नाही.