|
नाशिक – ‘लव्ह जिहाद’ पाठोपाठ आता ‘लँड जिहाद’ने (भूमी जिहादने) डोके वर काढले असून या प्रकरणात प्रशासनातील काही अधिकारी वर्ग असल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात उच्च स्तरावरून संबंधित प्रकरणाची चौकशी करण्यात यावी. संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुंबईत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे. यामध्ये त्यांनी संबंधित विषयांतील पुरावेही दिले.
या प्रकरणाची राज्यशासनाने नोंद घेत मालेगावचे साहाय्यक दुय्यम निबंधक ज्ञानेश्वर खांडेकर यांचा पदभार काढून घेतला असून तो साहाय्यक दुय्यम निबंधक सागर बच्छाव यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
नितेश राणे पुढे म्हणाले…
१. गुंठेवारी दस्त नोंदणी बंद असून त्याविषयी सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र शासनाकडून रिट याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यावर स्थगिती दिलेली आहे; मात्र तरीही संपूर्ण महाराष्ट्रात केवळ मालेगावातच अवैध खरेदी-विक्री चालू आहे. त्यामुळे ‘लँड जिहाद’ची प्रकरणे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.
२. सह दुय्यम निबंधक २ मालेगाव यांच्या कार्यालयात जागा बिनशेती नसतांना किंवा कोणताही आराखडा संमत नसतांना बिनशेती न करता अवैधरित्या गुंठेवारी पद्धतीने प्लॉटची खरेदी-विक्री करणे आणि तुकडे प्रतिबंधक कायदा विरोधात जाऊन गुंठेवारी पद्धतीने खरेदी-विक्री करून देण्यात येत आहे.
३. हा प्रकार तेथील साहाय्यक दुय्यम निबंधक अधिकारी व्ही.एम्. मांडे आणि जिल्हा मुद्रांक अधिकारी कैलास दवंगे यांच्याशी संगनमत करून केला जात आहे. यातील काही अधिकारी गेल्या १० वर्षार्ंपासून एकाच जागेवर ठाण मांडून बसल्याचे समजते.
४. हा मोठा भ्रष्टाचार असून यातून शहराच्या विकासाची कधीही भरून न येणारी हानी होत आहे.
(म्हणे) ‘लव्ह-जिहाद’, ‘लँड जिहाद’ असे शब्द वापरून नितेश राणे मुसलमान समाजाला अपकीर्त करत आहेत !’
राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदाराचा कांगावा !
‘लव्ह-जिहाद’, धर्मांतर, ‘लँड जिहाद’ यांसारखे शब्द वापरून नितेश राणे हे मालेगावातील मुसलमान समाजाला अपकीर्त करून धर्मात तेढ निर्माण करत आहे. (शब्द वापरले जातात, म्हणजे या स्वरूपाच्या घटना उघडपणे महाराष्ट्रात सर्वत्र घडत आहेत आणि हिंदू हे जाणून आहेत, हे मुसलमानांनी लक्षात घ्यावे ! – संपादक) मालेगाव येथे रोहिंग्या किंवा बांगलादेशी मुसलमान यांना शोधून दाखवावे, असे आवाहन मालेगावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार शेख आसिफ यांनी केले. नितेश राणे यांच्या पत्रकार परिषदेनंतर मालेगाव येथे मुसलमान समाजाकडून राणे यांच्या छायाचित्रावर चप्पल मारून त्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला.
संपादकीय भूमिकानितेश राणे यांनी पुरावे सादर केलेले असतांनाही अशा स्वरूपाचे आवाहन करणे म्हणजे मुसलमान समाज कायद्याला जुमानत नाही, हेच यातून दिसून येते ! |